Deepak Kesarkar: ”उद्धव ठाकरेंचं युती करण्यासाठी नरेंद्र मोदींशी बोलणं झालं होतं, पण…

मुंबई तक

05 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

मुंबई: राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटून गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच सध्या सरकार चालवत असल्याची टीका विरोधक करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की विस्तार हा येत्या रविवारपर्यंत […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटून गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच सध्या सरकार चालवत असल्याची टीका विरोधक करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की विस्तार हा येत्या रविवारपर्यंत होईल. परंतु, काल त्यांनी आपलं मत बदललं आणि म्हणाले मला वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलं ते मी सांगितलं. आज दीपक केसरकर यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय बोलणं झालं होतं हे देखील सांगितलं आहे.

हे वाचलं का?

दीपक केसरकर काय म्हणाले?

आदित्य ठाकरे वेगवेगळ्या मतदार संघात गेले आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवला. त्याबाबतीत आम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे. ज्यावेळी सुशांतसिंह राजपूत केस झाली त्यावेळी नारायण राणे हे पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंवरती आरोप करत होते. त्यावेळी मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली.

दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संवाद कथन केला. उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करायला तयार होते, त्यांचं नरेंद्र मोदींशी बोलणंही झालं होतं, पण एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेऊन ठाकरे युती करायला तयार होते परंतु आम्हाला आणि नरेंद्र मोदींना ते मान्य नव्हते असा गौप्यस्फोट केसरकरांनी केला आहे. यावेळी ते म्हणाले आम्हाला शिवसेना संपवायची नाही, तो मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, बाळासाहेबांचा जाज्वल्य इतिहास आहे. त्यामुळं आमच्यावर चुकीचे आरोप करु नका” असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

मी पॅचअप करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण…

पुढे केसरकर म्हणाले ”आम्ही उद्धव ठाकरेंना सतत सांगत होतो की आपला नैसर्गिक मित्र भाजपसोबत युती करुया, एकनाथ शिंदे यांनी बऱ्याच वेळा सांगितले परंतु ऐकलं गेलं नाही आणि मग कुटुंबप्रमुख जर आपलं ऐकत नसेल तर असा प्रसंग घडतो. मी पॅचअप करण्याचे सर्व प्रयत्न केले. ५० आमदारांचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं तुम्ही जे करणार होता ते योग्य आणि आम्ही केलं ते अयोग्य असं होत नाही.” उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बंडखोरांवर जहरी टीका करत आहे त्यावर केसरकर म्हणाले ”आमच्या बाबतीत जे शब्द वापरले जातात ते ऐकूण आम्हाला दु:ख होते”.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दीपक केसरकर म्हणाले…

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मी म्हणालो होते रविवारपर्यंत होईल परंतु, काही गोष्टी असतात त्यामुळे विस्तार लांबत असतो. याअगोदर अनेक वेळा महिना महिना मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे. खातेवाटप, कोणाला कोणती मंत्रिपदं यामुळं मंत्रिमंडळ विस्तार लांबत असतो असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

    follow whatsapp