Chat GPT वर 'ही' एक चूक कराल तर आयुष्य उद्ध्वस्त होईल, संभाषण आणि फोटो होतील लीक; काय काळजी घ्यावी?

Privacy on Chat GPT : अनेक वापरकर्त्यांच्या मनात एक प्रश्न असतो - ChatGPT वर केलेले संभाषण इंटरनेटवर लीक होऊ शकते का किंवा Google वर दिसू शकते का? याविषयी गेल्या वर्षी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये अनेक लोकांचे ChatGPT सोबतचे संभाषण इंटरनेटवर उपलब्ध आढळले होते. त्यानंतर हे खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

Privacy on Chat GPT

Privacy on Chat GPT

मुंबई तक

10 Mar 2026 (अपडेटेड: 10 Mar 2026, 12:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चॅट-जीपीटी वापरणे पडू शकते महागात

point

'ही' खबरदारी घ्या

point

अन्यथा संभाषण आणि फोटो होतील लीक

Privacy on Chat GPT : ChatGPT चा वापर सध्या वेगाने वाढत आहे. यावर लोक अनेकदा वैयक्तिक गोष्टीही शेअर करतात. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांच्या मनात एक प्रश्न असतो - ChatGPT वर केलेले संभाषण इंटरनेटवर लीक होऊ शकते का किंवा Google वर दिसू शकते का? याविषयी गेल्या वर्षी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये अनेक लोकांचे ChatGPT सोबतचे संभाषण इंटरनेटवर उपलब्ध आढळले होते. त्यानंतर हे खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

हे वाचलं का?

सामान्यतः ChatGPT चे चॅट पब्लिक नसते. म्हणजेच, तुम्ही ChatGPT सोबत जे संभाषण करता, ते थेट Google किंवा इंटरनेटवर दिसत नाही. मात्र काही वेळेस  तुमचे चॅट बाहेर जाऊ शकते किंवा सार्वजनिक होऊ शकते. ChatGPT वर केलेले संभाषण डीफॉल्टनुसार खाजगी राहते.

हे ही वाचा : सोनं-चांदी, शेतजमीन ते कर्ज...; शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?

लिंक शेअर केल्यास काय होते?

याचा अर्थ असा की तुमचे चॅट Google वर इंडेक्स होत नाही. इतर वापरकर्ते ते पाहू शकत नाहीत. हे कोणत्याही सार्वजनिक वेबपेजप्रमाणे इंटरनेटवर उपलब्ध नसते. Google सारखी सर्च इंजिन्स केवळ तेच पेजेस दाखवतात जे इंटरनेटवर सार्वजनिकरीत्या उपलब्ध असतात. चॅट जीपीटीचे सामान्य संभाषण असे पेज नसते. तरीही ChatGPT सोबत केलेले संभाषण काही प्रकारे लीक होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ChatGPT मधील संभाषण इंटरनेटवर पोहोचू शकते आणि याचे सर्वात मोठे कारण अनेकदा वापरकर्ता स्वतःच असतो. ChatGPT मध्ये चॅट शेअर करण्याचे फीचर असते. जर एखाद्या वापरकर्त्याने आपल्या संभाषणाची 'शेअर लिंक' तयार करून इतरांना पाठवली, तर ती लिंक असलेला व्यक्ती ते चॅट पाहू शकतो.

जर कोणी व्यक्ती ChatGPT चे संभाषण कॉपी करून या प्लॅटफॉर्मवर शेअर करत असेल, तर अशा परिस्थितीत सर्व चॅट्स लीक होऊ शकतात. अनेकदा लोक ChatGPT चॅटचे स्क्रीनशॉट घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करतात, ज्यामुळे संभाषण सार्वजनिक होते. काही वापरकर्ते थर्ड पार्टी ॲप्स, टूल्स किंवा ब्राउझर एक्शटेंशनद्वारे ChatGPT वापरतात. अशी टूल्स कधीकधी डेटा लॉग किंवा स्टोअर करू शकतात. म्हणूनच विश्वसनीय प्लॅटफॉर्म वापरणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : मुस्लीम व्यावसायिकाशी प्रेमविवाह, धर्मांतरण, चार मुलं आणि छळ; हिंदू धर्मात घरवापसी केलेल्या सायली सुर्वेचं प्रकरण काय?

चॅट कधी लीक होते?

ChatGPT बनवणारी कंपनी OpenAI च्या मते, काही संभाषणांचा वापर सिस्टमची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सुरक्षेसाठी केला जाऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की तुमचे चॅट इंटरनेटवर पब्लिक केले जाते. मात्र अनेकदा असे दिसून आले आहे की, एआय कंपनीत काम करणाऱ्या काही व्यक्ती देखील क्वालिटी कंट्रोल आणि ट्रेनिंगसाठी चॅट्स वाचतात. अशा वेळी देखील चॅट लीक होण्याचा धोका वाढतो.

सुरक्षिततेसाठी 'हे' उपाय करा 

जर तुम्हाला तुमचे ChatGPT संभाषण सुरक्षित ठेवायचे असेल, तर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. तुमच्या चॅटची शेअर लिंक बनवणे टाळा. शेअर लिंकचा पर्याय जवळपास प्रत्येक चॅटबॉटमध्ये मिळतो. पासवर्ड, बँक तपशील किंवा आयडी नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती शेअर करू नका. अनोळखी ब्राउझर एक्सटेंशन किंवा AI टूल्स वापरणे टाळा. संवेदनशील कागदपत्रे ChatGPT वर अपलोड करण्यापूर्वी विचार करा.

AI टूल्स आज काम सोपे करत आहेत, पण त्यांचा वापर करताना डिजिटल सावधगिरी देखील गरजेची आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इंटरनेटवर कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर करताना हे गृहीत धरले पाहिजे की, वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करणे आवश्यक आहे.

    follow whatsapp