Devendra Fadnavis : T-20 मॅच सुरु केलीय… मला काय? हा विचार सोडून द्या!

मुंबई तक

11 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:03 AM)

Two-day meeting of the BJP state executive : नाशिक : आता ट्वेंटी-ट्वेंटी मॅच सुरू केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवं संकल्प साकारण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. याकाळात आपल्याला चुकीच्या इच्छाशक्तीचा त्याग करावा लागेल, तेव्हाच समर्पण भाव निर्माण होईल. मला काय मिळणार हा विचार पुढच्या विधानसभेपर्यंत सोडून द्या. आपण लोकांचा विश्वास कमावला तर लोक पुढच्या अनेक […]

Mumbaitak
follow google news

Two-day meeting of the BJP state executive :

हे वाचलं का?

नाशिक : आता ट्वेंटी-ट्वेंटी मॅच सुरू केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवं संकल्प साकारण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. याकाळात आपल्याला चुकीच्या इच्छाशक्तीचा त्याग करावा लागेल, तेव्हाच समर्पण भाव निर्माण होईल. मला काय मिळणार हा विचार पुढच्या विधानसभेपर्यंत सोडून द्या. आपण लोकांचा विश्वास कमावला तर लोक पुढच्या अनेक वर्षांसाठी सत्तेत ठेवतील. यासाठी आपला वेळ आणि कष्ट मी मागत आहे, असं म्हणतं विविध पदांसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या सर्व आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सबुरीचा सल्ला दिला. (Devendra Fadnavis addressed the present workers in the two-day meeting of the BJP state executive.)

भाजप प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बिगुल वाजविण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

BJP : फडणवीस-मुंडेंचा एकाच गाडीतून प्रवास; काय कारण?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

  • नाशिकचं कौतुक :

फडणवीस म्हणाले, काही शहरांचे आपले एक वेगळे महत्त्व असते. नाशिकला कोणता संकल्प केला, की तो पूर्ण करण्यासाठी साक्षात प्रभू श्रीरामचंद्र आशीर्वाद देतात. शूर्पणखेचे नाक जेथे कापले गेले, ती हीच नाशिक नागरी आहे. अहंकाराचे नाक कापणारे हे शहर आहे. शत प्रतिशत भाजपाचा नारा याच शहरात दिला गेला, पण त्यावेळी ते लोकांना स्वप्न वाटले. आज स्थिती आपल्यापुढे आहे.

  • समर्पणासोबत त्यागाचीही भावाना :

अटलजी यांची एक सुंदर कविता आहे,

इससे फर्क नहीं पड़ता कि आदमी कहां खड़ा है?

पथ पर या रथ पर? तीर पर या प्राचीर पर?

फर्क इससे पड़ता है कि जहां खड़ा है,

या जहां उसे खड़ा होना पड़ा है, वहां उसका धरातल क्या है?

हे वाक्य आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे. पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी आपल्याला अंत्योदयाचा विचार दिला. आजचा दिवस समर्पण दिवस सुद्धा आहे. समर्पणासोबत त्यागाचीही भावना असते. चुकीच्या विचारांचा त्याग, अनियंत्रित महत्वाकांक्षेचा त्याग आणि अहाकरांचा त्याग हा अपेक्षित आहे.

  • हे गद्दारांचे सरकार नाही, हे खुद्दारांचे सरकार आहे :

आज राज्यात जे सरकार स्थापन झालं आहे. ते गद्दारांचं सरकार नाही, हे खुद्दारांचं सरकार आहे. हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे, ज्यांची विचारांसाठी खुद्दारी आहे अशा खुद्दारांचं हे सरकार आहे. गद्दारांना खाली पाडून आपल्या सोबत खुद्दार आले आणि आपण महाराष्ट्रात नवं सरकार उभं केलं. पण ते रोज सकाळी उठून हे सरकार बेकायदेशीर आहे, असं म्हणतात.

कारण त्यांना भीती आहे की, उरले-सुरलेले १०-१५ आमदारही निघून जातील. त्यामुळे त्यांना रोज सांगावं लागतं की, हे सरकार बेकायदेशीर आहे. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काहीही काळजी करू नका. आपण जे केलं ते नियमात आहे आणि कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयातही आपल्या बाजूने निकाल येईल, हे मी ठासून सांगतो.

हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण तर करेलच आणि पुढच्या निवडणुकीत पुन्हा दीडपट अधिक जागा घेऊन निवडून येणार. 200 जागा देखील आम्ही निवडून आणू. महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराची टी-ट्वेंटी खेळली, आपली सेवेची टी-ट्वेंटी आहे.

Priya Berde : राष्ट्रवादी सोडली, भाजपच्या ‘कमळासोबत’ पुढील प्रवास…

  • सरकारच्या कामांचा आढावा :

राज्यात सेवा करणारे सरकार आल्याबरोबर 10,000 कोटींची मदत आपण शेतकऱ्यांना दिली, त्यांच्या काळात जाहीर केलेली मदत सुद्धा दिली. 15 सिंचन प्रकल्पांना 24 हजार कोटी रुपयांची मान्यता दिली. समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात नेणे, नळगंगा-पैनगंगा प्रकल्प करण्याची संधी त्यांना होती. पण अडीच वर्ष कोणत्याच फाईलवरची धूळ त्यांनी झटकली नाही. आता 6 महिन्यात सर्व प्रकल्प ‘ऑन ट्रॅक’ आहे. समृद्धी महामार्ग राज्याच्या तिजोरीवर भार न टाकता आम्ही तयार करून दाखविला. पैसे नाहीत, म्हणून बोंबा मारणारे आम्ही नाही. त्यामुळे हाती घेण्यात येणारी प्रत्येक योजना, प्रकल्प पूर्ण करून दाखवू.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा शेतकऱ्यांना सुद्धा मोठा लाभ होईल. हा मार्ग एक नवा आर्थिक कॉरिडॉर असेल. नाशिकमध्ये नियो मेट्रो सुद्धा होणार आहे. लवकरच हा निर्णय सुद्धा झालेला दिसेल. सौर फिडरची योजना राज्य सरकार साकार करते आहे. त्यामुळे बारा महिने 24 तास वीज देता येणे शक्य होणार आहे. जेथे जमीन उपलब्ध होणार नाही, तेथे वार्षिक 70 हजार भाडे देण्यात येणार आहे. 2 लाख सौरपंपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये आता वंदे भारत रेल्वे तयार होणार आहेत. महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकाचा कायाकल्प होणार आहे. महाराष्ट्राला रेल्वेचा मोठा निधी यावर्षी मिळाला आहे.

    follow whatsapp