विश्वासमताचा ठरावही भक्कम बहुमताने जिंकणार, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई तक

• 12:28 PM • 03 Jul 2022

आज विधानमंडळात मतदान झालं. त्यामध्ये राहुल नार्वेकर १६४ मतं घेऊन निवडून आले. आमचे दोन सदस्य आजारी असल्याने दोन सदस्य आले नाहीत. एकूण १६६ लोकं आमच्या युतीच्या पाठिशी भक्कमपणे आहेत. सोमवारी विश्वासमताचा ठऱाव आम्ही ठेवत आहोत. हा ठरावही भक्कम बहुमताने मंजूर होईल हा मला विश्वास आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अधिवेशन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस […]

Mumbaitak
follow google news

आज विधानमंडळात मतदान झालं. त्यामध्ये राहुल नार्वेकर १६४ मतं घेऊन निवडून आले. आमचे दोन सदस्य आजारी असल्याने दोन सदस्य आले नाहीत. एकूण १६६ लोकं आमच्या युतीच्या पाठिशी भक्कमपणे आहेत. सोमवारी विश्वासमताचा ठऱाव आम्ही ठेवत आहोत. हा ठरावही भक्कम बहुमताने मंजूर होईल हा मला विश्वास आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अधिवेशन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक विधासभेत पार पडली. त्यावेळी शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट हे सेनेतले गट समोरासमोर आले होते. त्यात संघर्ष होऊ शकतो असं वाटलं होतं. मात्र तसं काहीही झालं नाही. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी ही निवडणूक जिंकली. त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी अजित पवार यांनी केलेलं भाषण चांगलंच चर्चेत होतं. सत्ताधारी तसंच विरोधातल्या नेत्यांनी भाषणं केली.

Aditya Thackeray:”देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षापूर्वी कानात सांगितलेलं ऐकलं नाही”

आरे बाबतही भाष्य

मेट्रोची कारशेड आरेमध्येच होणार त्यात काहीही बदल होणार नाही. तिथल्या कारशेडला विरोध म्हणजे पर्यावरणालाच विरोध आहे. आंदोलन करणाऱ्या छद्म पर्यावरणवाद्यांपासून सावध राहा. जे सच्चे पर्यावरणवादी आहेत त्यांना आम्ही ही बाब समजावून सांगू. त्यांच्या मनात काही गैरसमज असतील तर ते दूर होतील. मात्र ज्या ठिकाणी २५ टक्के काम पूर्ण झालं आहे तिथेच उर्वरित काम पूर्ण होईल. यात कोणताही बदल होणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

एवढंच नाही तर आमचं सरकार आलं आहे म्हणून आम्ही आधीच्या सरकारचे सरसकट सगळे निर्णय रद्द करणार नाही. जे निर्णय चुकीचे आहेत, कुहेतूने घेतले गेलेत असं अभ्यासानंतर लक्षात येईल तेच निर्णय रद्द केले जातील हेदेखील देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी सात जणांना अट करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्ही सखोल चौकशी करतो आहोत हेदेखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

    follow whatsapp