विवाहित पुरुष प्रेयसीसोबत मॉलमध्ये, अचानक बायकोची एंट्री, नंतर दोघींनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या

Viral News : विवाहित पुरुष त्याच्या प्रेयसीसोबत सिटी कार्ट मॉलमध्ये खरेदीसाठी गेला असता, बायको घटनास्थळी पोहोचली. दरम्यान पत्नी आणि नवऱ्याच्या गर्लफ्रेंडमध्ये मोठा वाद उफळला. या वादामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. दोन्ही महिलांनी एकमेकींचे केस धरले. हे प्रकरण नवरा बायको आणि पतीच्या गर्लफ्रेंडचं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Viral News

Viral News

मुंबई तक

• 07:00 AM • 12 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

एका विवाहित पुरुष प्रेयसीसोबत मॉलमध्ये

point

घटनास्थळी पत्नीची एंट्री

point

दोघींनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या

Viral News : उत्तर प्रदेशातील सोनभद्रा येथील रॉबर्ट्सगंजमध्ये विवाहित पुरुष त्याच्या प्रेयसीसोबत सिटी कार्ट मॉलमध्ये खरेदीसाठी गेला असता, घटनास्थळी बायको पोहोचली. दरम्यान पत्नी आणि नवऱ्याच्या गर्लफ्रेंडमध्ये मोठा वाद उफळला. या वादामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. दोन्ही महिलांनी एकमेकींचे केस धरले. हे प्रकरण नवरा बायको आणि त्या गर्लफ्रेंडचं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सातारा जिल्ह्यात पत्नीच्या कथित प्रियकराची हत्या! मृतदेहाशेजारी बसून 191 किमी प्रवास, पोलीस दलातील हवालदाराचं कांड

पुरुष प्रेयसीला मॉलमध्ये घेऊन आला आणि बायकोनं बघितलं

शनिवारी दुपारी 3 वाजता एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला घेऊन शॉपिंग मॉलमध्ये आला होता. मॉलमधील गर्दीत त्यांना कोणीही ओळखणार नाही असा त्या दोघांचा देखील गोड गैरसमज होता. पण त्याच ठिकाणी पुरुषाची बायकोच घटनास्थळी आली होती. पतीला दुसऱ्या मुलीसोबत बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. तेव्हा दोन्ही महिलांमध्ये वाद उफळला आणि धरपकड झाली. 

हे ही वाचा : खाकी वर्दीला बट्टा! महिला कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलचे अश्लील व्हिडिओ, दोघेही निलंबित

दोन्ही महिलांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

दोन्ही महिलांमध्ये फ्री-स्टाईल मारहाण झाली. त्यांनी एकमेकांचे केस ओढले. एकमेकींच्या कानशि‍लात लगावली आणि आपला राग व्यक्त केला. उपस्थित कर्मचारी आणि ग्राहकांना घटनास्थळी नेमकं काय सुरु होतं हे समजलं नाही. मॉल व्यवस्थापक आणि रक्षकांनी बराच प्रयत्न करून दोन्ही महिलांना वेगळं केलं. अंतिमक्षणी परिस्थिती बिघडल्याचे पाहून व्यवस्थापनाने तिघांनाही मॉलमधून बाहेर काढले. ते सर्व स्थानिक रहिवासी असल्याचे सांगण्यात येत  आहे, या वादाची मॉलमध्ये चर्चा झाली. 
 

    follow whatsapp