पोलीस होण्याचं स्वप्न उंबरठ्यावर, बीडमध्ये पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, कारण आलं समोर

Beed News : राज्यभरात पोलीस भरती जाहीर झाली आहे. अनेक तरुण आपलं स्वप्न उराशी घेऊन दिवस-रात्र मेहनत करत आहेत. यंदाच्या पोलीस भरतीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. याच पोलीस भरतीदरम्यान एका तरुणावर काळाने घाला घातला आहे.

Beed News

Beed News

मुंबई तक

11 Feb 2026 (अपडेटेड: 11 Feb 2026, 06:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये 174 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया

point

डीहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू...

Beed News :  राज्यभरात पोलीस भरती जाहीर झाली आहे. अनेक तरुण आपलं स्वप्न उराशी घेऊन दिवस-रात्र मेहनत करत आहेत. यंदाच्या पोलीस भरतीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. याच पोलीस भरतीदरम्यान एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. बीडमधील उमेदवाराचा पोलीस भरतीच्या प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव दीपक वाव्हळ असल्याचे सांगण्यात येत आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा! बीडमधील परीक्षा केंद्रावर पालकांकडून कॉपीचा पुरवठा... ड्रोनमध्ये कैद, आता FIR चे आदेश

डीहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू...

पोलीस भरतीदरम्यान दिपकला भोवळ आल्याने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डीहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटका आला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

बीडमध्ये 174 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया

दरम्यान, बीडमध्ये 174 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया आजपासून सुरु झाली. याच प्रक्रियेदरम्यान परळी येथील दिपक वाव्हाळ नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला 1600 मीटर धावताना त्याला भोवळ आल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. नंतर त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे ही वाचा : युट्यूबर तरुणीने वडिलांवर विळ्याने हल्ला करत संपवलं, हादरवून टाकणारा धक्कादायक प्रकार

या घटनेनं जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे. दिपक वाव्हाळ या उमेदवाराचा उपचारादरम्यान मृत्यूमुळे त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न अधूरं राहिलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

    follow whatsapp