आजारी बायकोनं जेवण बनवण्यास दिला नकार, मद्यधुंद नवऱ्याने पत्नीवर गोळ्या झाडल्या

मुंबई तक

12 Feb 2026 (अपडेटेड: 12 Feb 2026, 10:26 AM)

Crime News : नवरा-बायकोच्या नातेसंबंधाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मद्यपान करणाऱ्या पतीने आपल्या आजारी पत्नीवर गोळीबार करून तिची हत्या केली. हत्या करण्याचे कारण समोर आले आहे. बायको आजारी असल्याने तिनं जेवण बनवण्यास नकार दिला होता, याचाच मद्यपान केलेल्या तरुणाला राग अनावर झाल्याने त्याने आपल्याच बायकोला संपवलं.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपी नवऱ्याने बायकोवर केला गोळीबार 

point

14 वर्षीय मुलगी आणि 11 वर्षीय मुलाच्या डोळ्यादेखत काय घडलं?

Crime News : मध्य प्रदेशातील ग्वालेरमधून नवरा-बायकोच्या नातेसंबंधाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मद्यपान करणाऱ्या पतीने आपल्या आजारी पत्नीवर गोळीबार करून तिची हत्या केली. हत्या करण्याचे कारण समोर आले आहे. बायको आजारी असल्याने तिनं जेवण बनवण्यास नकार दिला होता, याचाच मनात राग धरून मद्यधुंद पतीने आपल्याच बायकोला संपवलं. ही घटना शनिवारी रात्री 11 वाजता मुरार येथील विभागात घडली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :  बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका, शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय

आरोपी नवऱ्याने बायकोवर केला गोळीबार 

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी सोनू तोमर मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला होता. त्याने आपल्या बायकोला जेवण बनवण्यास सांगितले होते, बायकोची प्रकृती चिंताजनक असल्याने तिने जेवण बनवण्यास नकार दिला होता. बायकोनं जेवण बनवणार नाही असं सांगितल्यानंतर सोनू तोमर संतापला आणि त्याने रागाच्याभरात पत्नीवर गोळीबार करत संपवलं.  

14 वर्षीय मुलगी आणि 11 वर्षीय मुलाच्या डोळ्यादेखत घटनेचा थरार 

जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरात 14 वर्षीय मुलगी आणि 11 वर्षीय मुलगा त्या ठिकाणी उपस्थित होते. संबंधित घटनेची माहिती महिलेनं पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  

हे ही वाचा : हेल्मेट डोक्यात घालून केली हत्या; फूड डिलिव्हरी एजंट्सचे कृत्य, व्यावसायिकाला संपवलं

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोनू तोमर यांना बजारिया परिसरात दारू पिताना ताब्यात घेतलं. तक्रारीदरम्यान आरोपीने दावा केला की, त्याने वापरलेले हत्यारे फेकून दिले. पोलीस सध्या मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते, असं सांगण्यात येत आहे.