Mumbai Airport वर I Phone चं स्मगलिंग रॅकेट उध्वस्त, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

मुंबई तक

• 07:11 AM • 29 Nov 2021

मुंबई विमानतळावर DRI (Directorate of Revenue Intelligence) ने I phone या ब्रँडेड कंपनीच्या फोनचं स्मगलिंग रॅकेट उध्वस्त केलं आहे. DRI च्या अधिकाऱ्यांनी अवैध मार्गाने आयफोन भारतात आणले जात असताना पकडले आहेत. २६ नोव्हेंबरला DRI च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या एका माहितीच्या आधारावर ही कारवाई करत दोन consignments ची तपासणी करण्यात आली. हाँग काँग वरुन या consignments मुंबई […]

Mumbaitak
follow google news

मुंबई विमानतळावर DRI (Directorate of Revenue Intelligence) ने I phone या ब्रँडेड कंपनीच्या फोनचं स्मगलिंग रॅकेट उध्वस्त केलं आहे. DRI च्या अधिकाऱ्यांनी अवैध मार्गाने आयफोन भारतात आणले जात असताना पकडले आहेत. २६ नोव्हेंबरला DRI च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या एका माहितीच्या आधारावर ही कारवाई करत दोन consignments ची तपासणी करण्यात आली. हाँग काँग वरुन या consignments मुंबई विमानतळावर आल्या होत्या.

हे वाचलं का?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या consignments भारतात आल्यानंतर कागदपत्रांमध्ये त्यात मेमरी कार्ड असल्याचा उल्लेख केला होता. परंतू DRI च्या अधिकाऱ्यांनी याची तपासणी केली असता त्यात iPhone 13 Pro (2245 नग), iPhone 13 Pro Max (1401 नग), Google Pixel 6 pro (12 नग) आणि 1 Apple Smart Watch असा मुद्देमाल सापडला आहे.

त्यामुळे या consignments मध्ये अधिकाऱ्या ३ हजार ६४६ आयफोन सापडले. वरील सर्व मुद्देमाल DRI च्या अधिकाऱ्यांनी Customs Act, 1962 अंतर्गत हस्तगत केला आहे. या मुद्देमालाची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे ४२.८६ कोटी इतकी सांगितली जात आहे. परंतू कागदपत्रांमध्ये ८० लाखांचा मुद्देमाल आणला जात असल्याचं दाखवण्यात आल्याचं DRI च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

परदेशातून भारतात येणाऱ्या ब्रँडेड मोबाईल फोनवर ४४ टक्के कस्टम ड्युटी आकारली जाते. परंतू स्मगलर्ग आपला माल भारतात आणण्यासाठी किती जलग पद्धतीने आपलं नेटवर्क तयार करतात हे या कारवाईतून समोर आलं आहे. भारतात सध्याच्या घडीला आयफोनच्या लेटेस्ट मोबाईलची किंमत ही ७० हजारांच्या घरात आहे. काही महागडे मोबाईल हे भारतात लाखांच्या घरात विकले जात आहेत.

    follow whatsapp