सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी, दर्शनाची वेळ बदलली

मुंबई तक

• 12:33 PM • 26 Dec 2021

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे वाढत जाणारे रुग्ण पाहता सरकारने जमावबंदीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रसिद्ध देवस्थानांनी भक्तांसाठी दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. सलग दोन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजून गेला होता. दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीने ओमिक्रॉनचं संकट पाहता भाविकांसाठी दर्शनाची वेळ रात्री […]

Mumbaitak
follow google news

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे वाढत जाणारे रुग्ण पाहता सरकारने जमावबंदीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रसिद्ध देवस्थानांनी भक्तांसाठी दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. सलग दोन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजून गेला होता.

हे वाचलं का?

दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीने ओमिक्रॉनचं संकट पाहता भाविकांसाठी दर्शनाची वेळ रात्री ९ वाजेपर्यंत ठेवली आहे. रात्री ९ वाजल्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद होणार आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर मंदिर समितीने दर्शनासाठीच्या वेळेत हा बदल केला आहे. याचसोबत गर्दीच्या वेळी नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालन होण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

त्यामुळे नव्या नियमांनुसार विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी रात्री ९ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे.

शिर्डी : Omicron संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिराच्या दर्शन व्यवस्थेत बदल

    follow whatsapp