पित्याने मुलाला दुध आणायला पाठवले, पिसाळलेल्या बापानं अल्पवयीन लेकीचा गळा चिरला, हादरवणारं प्रकरण

Crime News : एका पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीचा गळा चिरून त्याची हत्या केली आहे. वडिलांनी मुलीबाबत असं का केलं असावं, याबाबत जाणून घेऊयात.

crime news

crime news

मुंबई तक

• 05:28 PM • 23 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पित्याकडून अल्पवयीन मुलीची गळा चिरून हत्या

point

नेमकं काय घडलं? 

Crime News : वडील आणि मुलीच्या नात्याची चर्चा ही जगभरात होते. वडिलांची सर्वात लाडकी व्यक्ती कोण असेल तरी ती लेक असते. पण, एका पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीचा गळा चिरून हत्या केली आहे. मानसिक त्रासाने त्रस्त झालेल्या पित्यानेच आपल्या पोटच्या लेकीचा खून केला. दरम्यान, मृत्यू झालेल्या मुलीचं (वय 15) होते. ही घटना राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील खामनोर पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी... 'उद्या 12 वाजता...' संजय राऊतांनी दिली अवघ्या महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज!

नेमकं काय घडलं? 

या घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. आरोपीने हे जाणूनबुजून हे कृत्य केलं असल्याचं बोललं जातंय. त्याने प्रथम त्याच्या मुलाला दूध आणण्याच्या बहाण्याने दुकानात पाठवले होते. एका तासानंतरच घरी ये असं त्या वडिलांनी सांगितलं होतं. दरम्यान, त्याच्या मुलीवर हल्ला करण्यात आला होता.

आरोपी अटकेत

घटनेची माहिती मिळताच, खामनोर पोलीस ठाण्यातील पोलीस पथक तात्काळपणे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला. तसेच पोलिसांच्या तत्परतेने काही वेळातच आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात खून केल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले की, आरोपी हा गेल्या दोन वर्षांपासून मानसिक नैराश्यात ग्रस्त होता. त्याचे आणि पत्नीशी संबंध बिघडले होते. आरोपी हा गावात फक्त त्याच्या मुलासह आणि मुलीसह राहत होता.

हे ही वाचा : सोलापूर हादरलं! कपड्याला लहान बाळाची लागली शी, अकबरने प्रेयसीच्याच चिमुकल्याची गळा दाबून केली हत्या

पोलिसांनी या हत्येबाबत खरं कारण सांगितलं नाही. मानसिक तणावामुळे की इतर काही कारणाने असं कृत्य केलंय का? असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, आता गावकरी हैराण झाले आहेत आणि न्यायाची देखील मागणी केली जात आहे.

    follow whatsapp