Pune Crime : पुणे जिल्ह्यतील इंदापूर तालुक्याच्या शेळगावात गावठाण परिसरात एक धक्कादायक घटना घडली. महिला अंघोळीला जाताना एका व्यक्तीने महिलेचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मृत महिलेचं नाव मनीषा मल्हारी खोमणे (वय 23) असं आहे. संशयित आरोपी हा दुसरा तिसरा कोणीही नसून तिचा पती असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मध्यरात्री हॉटेलमध्ये सुरु होता चार जोडप्यांचा घाणेरडा खेळ, पोलिसांनी रेड टाकताच नको त्याच अवस्थेत आढळले
पत्नी अंघोळीसाठी गेली अन्...
प्राथमिक माहितीनुसार, पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास मनीषा खोमणे या अंघोळीसाठी निघाल्या होत्या. त्याचक्षणी पतीने पाठीमागून येऊन मुलीच्या डोक्यात प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात मनीषा जागीच कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. परिस्थिती बघून त्यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. संशयित आरोपी मल्हारी खोमणेवर यापूर्वी देखील वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर संशयित आरोपीने हा घटनास्थळावरून पळ काढला होता. वालचंदनगर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास केला आहे.
हे ही वाचा : पित्याने मुलाला दुध आणायला पाठवले, पिसाळलेल्या बापानं अल्पवयीन लेकीचा गळा चिरला, हादरवणारं प्रकरण
आरोपीने आपल्या पत्नीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर पोलीस शोधत आहेत. पत्नीला त्याने इतक्या क्रूर पद्धतीने मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहेत. या घटनेनं शेळगार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनं कुटुंबातील लोकांवर काळाचा घाला घालण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











