Jalna crime : जालन्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतून एका तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना जालना शहरातील जालना-मंठा रोडवर घडल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची जालना शाखेनं कारवाई केली आहे. या प्रकरणातील मृत तरुणाचे नाव सागर धानुरे असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पनवेलमध्ये पुरुष लेडिज डब्ब्यात शिरला, महिलांनी जाब विचारताच धावत्या लोकलमधून विद्यार्थीनीला बाहेर फेकलं, सर्वत्र संताप
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, सागर धानुरे याचा मृतदेह हा त्याच्याच कारमध्ये आढळूल आल्याचे वृत्त आहे. तसेच त्याच्या शरीरावर चाकूने वार केल्याचे आढळून आले आणि मोठ्या जखमा देखील होत्या. त्याच कारमध्ये एक पिस्तूलही आढळली होती. दरम्यान, सागर धानुरे याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता.
खून करून आत्महत्येचा रचला बनाव
या प्रकरणात पोलिसांनी संशय व्यक्त केल्याने तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषन आणि पुराव्याच्या आधारे केलेल्या एकूण तपासातून सागरची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. आत्महत्या केलेला बनाव हा खोटा पडला. या प्रकरणात अटकेत असलेल्या दोघांची नावे समोर आली आहे. कल्याण भोजने (वय 41 वर्ष) आणि कमलेश झाडीवाले अशी त्यांची नावे आहेत.
हे ही वाचा : 'या' राशींवर होणार प्रेमाचा वर्षाव, तर काही राशीतील लोकांना नोकरीत मिळणार प्रमोशन
पैशांच्या देवाघेवाणीतूनच दोघांनी मिळून सादर धानुरेच्या हत्येचा कबुलीनामा दिला. आरोपींनी सागरची हत्या करून त्याने आत्महत्या केल्याचा पद्धतशीरपणे बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी या घटनेचा योग्य तो तपास करत गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











