दोन सख्ख्या बहिणी अचानक रहस्यमयरित्या गायब... 'तो' एक पुरावा अन् सगळं उघडकीस! नेमकं प्रकरण काय?

बेपत्ता झालेल्या दोन्ही तरुणी अल्पवयीन असून त्यातील एक केवळ 13 वर्षांची तर दुसरी 16 वर्षांची होती. घरातून अचानक गायब झाल्याने त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय? हे कुटुंबियांना कळत नव्हतं.

'तो' एक पुरावा अन् सगळं उघडकीस!

'तो' एक पुरावा अन् सगळं उघडकीस!

मुंबई तक

• 07:51 AM • 24 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोन सख्ख्या बहिणी अचानक रहस्यमयरित्या गायब...

point

'तो' एक पुरावा अन् सगळं उघडकीस!

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News: दिल्लीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कुटुंबातील दोन सख्ख्या अचानक घरातून रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्या आणि कुटुंबियांना सुद्धा याची काहीच कल्पना नव्हती. बेपत्ता झालेल्या दोन्ही तरुणी अल्पवयीन असून त्यातील एक केवळ 13 वर्षांची तर दुसरी 16 वर्षांची होती. घरातून अचानक गायब झाल्याने त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय? हे कुटुंबियांना कळत नव्हतं. त्यानंतर, हे प्रकरण पोलिसात गेलं आणि क्राइम ब्रांचच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने याचा तपास सुरू केला आणि अखेर सत्य उघडकीस आलं. 

हे वाचलं का?

घरातून पैसे घेऊन पळून गेल्या अन्... 

तपासादरम्यान दोघी 7 वी आणि 8 वी इयत्तेत शिकत असून त्यांचे आई-वडील जवळच्याच एका टाइल फॅक्ट्रीमध्ये मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचं समोर आलं. 15 डिसेंबर रोजी वडिलांनी कोणत्या तरी कारणावरून दोन्ही बहिणींना ओरडलं म्हणजेच फटकारलं होतं. त्यानंतर, त्या दोन्ही मुलींना याचा खूप राग आला आणि आता या घरात राहणार नसल्याचं त्यांनी ठरवलं. त्या दोघींनी गुपचूप कपाटातून 4,000 रुपये घेतले आणि कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या. 

पीडितांच्या कुटुंबियांची चौकशी 

मुली घरातून गायब असल्याचं समजताच कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. 18 डिसेंबरपर्यंत मुलींचा पत्ता न लागल्याने, मुंडका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 137 (2) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याने, दिल्ली पोलिसांच्या नोडल एजन्सी, AHTU कडे तपास सोपवण्यात आला. त्यानंतर पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं. टीमने आधी पीडितांच्या कुटुंबियांची चौकशी केली आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या मित्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता, ठाण्याच्या अंतर्गत भागांत धावणार मेट्रो! थेट रेल्वे स्थानकाशी कनेक्शन अन्...

अखेर बहिणींचं लोकेशन सापडलं अन्... 

मुली मोबाईल फोनचा वापर करत नसल्याने त्यांचं लोकेशन ट्रेस करणं शक्य नव्हतं. तरी पोलिसांच्या टेक्निकल टीम आणि मॅन्युअल इंटेलिजन्सच्या आधारे तपास करण्यात आला. स्थानिक चौकशी दरम्यान, मुलींना एका मित्राच्या मदतीने कुठेतरी नेलं जात असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी या मित्राची ओळख पटवली आणि त्याच्या डिजिटल फुटप्रिंट्सचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. शेवटी, पोलिसांना दिल्लीच्या रनहोला परिसरातील एक लोकेशन सापडलं. 

भाड्याच्या खोलीत सुरक्षित आढळल्या 

22 डिसेंबर रोजी सकाळी, एएचटीयूच्या पथकाने रानहोलाच्या गल्लीतील एका घरावर छापा टाकला. दोन्ही बहिणी त्या भाड्याच्या खोलीत सुरक्षित आढळल्या. चौकशी केल्यावर त्या दोघींनी एका मित्राच्या मदतीने खोली भाड्याने घेतली असल्याचं समोर आलं. मात्र, त्या दोघींना त्यांच्या घरी जायची इच्छा नव्हती. त्यांनी त्या 4,000 रुपयांपैकी काही रक्कम जेवणावर आणि खोलीसाठी अॅडव्हान्स म्हणून खर्च केली होती. त्यांना वाटलं होतं की त्या घरातून बाहेर पडून स्वतःचं जग वेगळं निर्माण करतील, परंतु बाहेरील जग त्यांच्यासाठी किती धोकादायक असू शकतं? याची त्यांना जाणीव नव्हती.

पोलिसांना दोघींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची काउन्सलिंग केली आणि रागाच्या भरात घेतलेला निर्णय किती चुकीचा ठरू शकतो, हे त्यांना समजावण्यात आलं. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, मुलींना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं. 

    follow whatsapp