गोव्याच्या किनाऱ्यावर फुल्ल दारु प्यायले, समोर रशियन महिला दिसताच नराधमांमधील राक्षस जागा, नको ते करण्याचा प्रयत्न..

Goa Crime News : तेलंगणाहून आलेल्या दोन मद्यधुंद पर्यटकांनी एका परदेशी महिलेला त्रास दिल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेनं सेल्फी काढण्यास नकार दिल्यानंतर दोघांनी तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाने महिलेच्या गळ्यात हात घालून तिला किस करण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. ही बाब लक्षात येताच बीचवर तैनात लाइफसेव्हर्सनी तातडीने हस्तक्षेप केला. दोन्ही पर्यटकांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Goa Crime News

Goa Crime News

मुंबई तक

13 Feb 2026 (अपडेटेड: 13 Feb 2026, 02:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गोव्याच्या किनाऱ्यावर फुल्ल दारु प्यायले

point

समोर रशियन महिला दिसताच नराधमांमधील राक्षस जागा

point

नको ते करण्याचा प्रयत्न..

Goa Crime News : गोव्यातील बागा बीचवर रशियन महिला पर्यटकासोबत छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही देशांतर्गत पर्यटकांनी बीचवर उपस्थित असलेल्या परदेशी महिलांना त्रास दिल्याची माहिती आहे. मात्र, बीच मार्शल आणि लाइफसेव्हर यांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणण्यात यश आले. बीच सेफ्टी एजन्सी Drishti Marine यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गेल्या आठवड्यात घडली. संबंधित पर्यटकांना घटनास्थळीच इशारा देऊन सोडण्यात आले.

हे वाचलं का?

एजन्सीच्या माहितीनुसार मागील एका आठवड्यात गोव्याच्या किनारपट्टीवर महिला पर्यटकांशी छेडछाडीच्या चार घटना नोंदवण्यात आल्या आहेत. याशिवाय तीन वैद्यकीय आपत्कालीन प्रकरणे आणि एक बेपत्ता असल्याचे प्रकरण नोंदवले गेले. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचेही एजन्सीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : पत्नीने नंबर ब्लॉक केला, पतीने थेट लोणावळ्यातील टायगर पॉईंटरवरुन उडी मारली; बायकोच्या वाढदिवशी संपवलं आयुष्य

दरम्यान, अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली असून तेलंगणाहून आलेल्या दोन मद्यधुंद पर्यटकांनी एका परदेशी महिलेला त्रास दिल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेनं सेल्फी काढण्यास नकार दिल्यानंतर दोघांनी तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाने महिलेच्या गळ्यात हात घालून तिला किस करण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. ही बाब लक्षात येताच बीचवर तैनात लाइफसेव्हर्सनी तातडीने हस्तक्षेप केला. दोन्ही पर्यटकांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

सध्या गोव्यातील लोकप्रिय बीचवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बागा, Calangute, Candolim, कोलवा आणि बेनौलिम या पाच प्रमुख बीचवर सुमारे 70 बीच मार्शल तैनात करण्यात आले आहेत. महिला पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. दक्षिण गोव्यातील कोलवा बीचवरही गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटकातून आलेल्या सात ते आठ पर्यटकांच्या ग्रुपवर रशियन महिलांचे संमतीशिवाय फोटो व व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे. लाइफसेव्हर्सनी त्वरित हस्तक्षेप करत सर्वांना गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले.

रविवारी संध्याकाळी पटनेम बीचवर बिहारमधून आलेल्या पाच पर्यटकांनी एका जोडप्याला त्रास दिल्याची घटना घडली. पुण्यातील या जोडप्याचा परवानगीशिवाय व्हिडिओ तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. बीचवरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. गोव्यातील सर्व बीचची सुरक्षा व्यवस्था Drishti Marine या एजन्सीकडे असून, त्यांचे मार्शल सतत गस्त घालत असतात. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

11 वीच्या विद्यार्थीनीवर 4 वेगवेगळ्या कारमध्ये नेऊन अत्याचार, व्हिडीओ बनवून 40 हजार कमावले; नराधमांना अटक

    follow whatsapp