लघुशंका करण्यापासून थांबवले, लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी केली हत्या; नेमकं काय घडलं?

Crime News : प्रयागराजमधील नैनी परिसरात एका लग्नसमारंभादरम्यान झालेल्या वादातून 45 वर्षीय व्यक्तीची लाठ्याकाठ्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. निषाद असे मृत व्यक्तीचे नाव असून ही घटना गुरुवारी (12 फेब्रुवारी) रात्री मदौका क्षेत्रातील एका हॉलबाहेर घडली. घरासमोर सुरु असलेल्या घाणेरड्या प्रकाराला विरोध करणे निषाद यांच्या जीवावर बेतले आहे

Crime News

Crime News

मुंबई तक

• 06:06 PM • 13 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

लघुशंका करण्यापासून थांबवले

point

लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी केली हत्या

Crime News : प्रयागराजमधील नैनी परिसरात एका लग्नसमारंभादरम्यान झालेल्या वादातून 45 वर्षीय व्यक्तीची लाठ्याकाठ्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. निषाद असे मृत व्यक्तीचे नाव असून ही घटना गुरुवारी (12 फेब्रुवारी) रात्री मदौका क्षेत्रातील एका हॉलबाहेर घडली. घरासमोर सुरु असलेल्या घाणेरड्या प्रकाराला विरोध करणे निषाद यांच्या जीवावर बेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला, 19 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती

लघुशंकेवरुन झाला वाद

हॉलमध्ये सुरू असलेल्या एका लग्नासाठी आलेले काही पाहुणे निषाद यांच्या घराच्या भिंतीजवळ लघुशंका करत होते. निषाद यांनी याला विरोध केला आणि त्यांना तिथून जाण्यास सांगितले. याच कारणावरून पाहुणे आणि निषाद यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या टोळक्याने निषाद यांच्यावर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात निषाद गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

एका पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हत्येचा मुख्य आरोपी सुनील कनौजिया हा स्वतः पोलीस दलात कार्यरत आहे. सुनील हा मऊ जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तैनात असून तो आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी आला होता. रक्षकच भक्षक बनल्याने या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी मुख्य आरोपी कॉन्स्टेबलसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 6 फुट 8 इंच उंची, भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले; Zimbabwe चा 'हा' तगडा गोलंदाज आहे तरी कोण?

सहा आरोपी फरार

एसीपी सुनील कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते. प्राथमिक तपासात लघुशंका करण्याच्या क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले आहे. फरार असलेल्या इतर सहा आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस शिपायाचा या गुन्ह्यात सहभाग असल्याने पोलीस खात्यातूनही त्याच्यावर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

    follow whatsapp