वंदे भारत रेल्वेच्या शौचालयात साप ठेवणारा आरोपी मुंब्रा येथून अटक, सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद

मुंबई तक

13 Feb 2026 (अपडेटेड: 13 Feb 2026, 09:35 PM)

Crime News : मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाच्या आरपीएफने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप ठेवणाऱ्या आरोपीच्या मुंब्रा येथूनच मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात आरपीएफने अल्पावधीतच गुन्ह्याचा छडा लावण्यास यश मिळावलं )

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाच्या आरपीएफची कौतुकास्पद कामगिरी

point

शौचालयात साप ठेवणारा तरुण अटकेत

Crime News : मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाच्या आरपीएफने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप ठेवणाऱ्या आरोपीच्या मुंब्रा येथून मुसक्या आवळल्या आहेत. रेल्वेत साप आढळल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात आरपीएफने काही वेळातच विलंब न करता आरोपीचा छडा लावण्यास यश मिळावलं. या प्रकरणातील आरोपीची माहिती समोर आली आहे. जगन अर्जुन भाले (वय 37) असे आरोपीचे नाव आहे, त्याला 12 फेब्रुवारी रोजी मुंब्रा येथून अटक केली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : माधुरी दीक्षितच्या सर्वात वादग्रस्त गाण्यावर गौतमी पाटीलचा तुफान डान्स, स्टेज दणाणून सोडलं! पाहा व्हिडीओ

शौचालयात साप ठेवणारा तरुण अटकेत 

27 डिसेंबर रोजी गाडी क्र. 22225 च्या सी-16 कोचच्या शौचालयात साप आढळून आल्याचं वृत्त आहे. हे प्रकरण लाक्षात घेताच शौचालय बंद करण्यात आले आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. दरम्यान सोलापूर स्थानकावर सापाला पकडण्यात यश आलं आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित घटनेनंतर आरपीएफने सीसीटीव्हीचा तपास केला असता, अज्ञात व्यक्तीला शौचालयात साप असल्याचे आढळून आले होते. संबंधित आरोपीवर रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 (ब), 147 आणि 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एक विशेष तपासाणी करण्यासाठी नियुक्त पथक नेमण्यात आले होते. 

आरोपीच्या आवळल्या मुसक्या 

दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील 37 वर्षीय जगन अर्जुन भाले याला 12 फेब्रुवारी रोजी मुंब्रा येथून अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली होती. 

हे ही वाचा : लॉ कॉलेजच्या वर्गात गोळी झाडून तरुणीची हत्या... आता, उपचारादरम्यान आरोपी प्रिन्सचा मृत्यू!

दरम्यान, आरोपीला कल्याण येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यादरम्यान न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे मध्य रेल्वे आरपीएफने पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि कार्यतत्परता सिद्ध केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.