Crime News: पंजाबच्या तरनारन येथील लॉ कॉलेजच्या क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील मुलीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. संबंधित घटना ही सोमवारी (9 फेब्रुवारी) घडली असून या भयानक घटनेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं.
ADVERTISEMENT
संबंधित घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार, क्लास सुरू होण्यापूर्वी पीडिता संदीप आणि आरोपी प्रिन्स यांच्यात वाद झाला. हा वाद टोकाला पोहोचताच, अचानक प्रिन्सने त्याच्याजवळ असलेली पिस्तूल बाहेर काढली आणि थेट संदीपवर गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर, ती जमिनीवर कोसळली आणि प्रिन्सने लगेच पिस्तून पुन्हा लोड करून स्वत:वर गोळी झाडली. यामध्ये, दोघांचा जागीच मृत्यू झाला. गोळी लागल्यानंतर आरोपी 20 वर्षीय प्रिन्स राज याला गंभीर अवस्थेत अमृतसरमधील गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची बातमी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
वर्गातील ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. फुटेजमध्ये आरोपी प्रिन्स राज, संदीप कौर आणि पीडितेची मैत्रीण एकत्र बसलेले दिसले. इतर विद्यार्थीही जवळपास उपस्थित होते. अचानक, दोघांचा एकमेकांसोबत वाद सुरू असताना प्रिन्स त्याच्या जागेवरून उठला, त्याने त्याच्या बॅगेतून पिस्तूल काढले आणि एकही शब्द न बोलता संदीप कौरच्या डोक्यावर ती रोखून गोळी झाडली. त्यानंतर, क्षणाचाही विलंब न करता आरोपीने स्वत:वर सुद्धा गोळी झाडली. त्यावेळी, वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. तातडीने कॉलेज प्रशासन आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
हे ही वाचा: T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला, 19 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती
दरम्यान, संदीप कौरच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार, प्रिन्स काही काळापासून तिला त्रास देत होता आणि तो एकदा तिचा पाठलाग करत तिच्या घरीही गेला होता. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि लवकरच तिचं लग्न होणार होतं. परंतु, आरोपी तिचा छळ करायचा आणि त्यामुळेच ही भयानक घटना घडली. आता, नातेवाईकांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे.
घटनेत ज्या पिस्तूलचा वापर करण्यात आला, ती अवैध असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं. शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गतही या प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, आरोपी विद्यार्थ्याकडे ती पिस्तूल कुठून आली? याचा पोलीस तपास करत आहेत. प्रिन्स राज हा मल्लिया गावाचा रहिवासी होता. तसेच, संदीप कौर नौशेरा पन्नुआं गावाची रहिवासी होती. दोघेही एकाच कॉलेजमध्ये 'लॉ'चे प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. एकत्र शिकणाऱ्या दोन तरुणांचे आयुष्य अशा प्रकारे संपेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती.
ADVERTISEMENT











