भारतातील सर्वात महागड्या शाळा; १५ लाखांपर्यंत आहे फी…

दून स्कूल ही एक मुलांची शाळा आहे, जी दून खोऱ्यात १९२९ साली सुरु करण्यात आली होती. या शाळेची फी ९ लाख ७० हजार रुपये आहे. तसंच साडे तीन लाख रिफंडेबल डिपॉझिट आहे. सिंधिया स्कूल ग्वालियर स्थित ही शाळा महाराज माधवराव सिंधिया यांनी १८९७ साली सुरु केली होती. इथली फी ७ लाख ७० हजार आहे. मायो […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:41 AM • 10 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

दून स्कूल

ही एक मुलांची शाळा आहे, जी दून खोऱ्यात १९२९ साली सुरु करण्यात आली होती. या शाळेची फी ९ लाख ७० हजार रुपये आहे. तसंच साडे तीन लाख रिफंडेबल डिपॉझिट आहे.

सिंधिया स्कूल

ग्वालियर स्थित ही शाळा महाराज माधवराव सिंधिया यांनी १८९७ साली सुरु केली होती. इथली फी ७ लाख ७० हजार आहे.

मायो कॉलेज

राजस्थानमधील अजमेर येथील मायो कॉलेजही अत्यंत जुने आहे. इथली वार्षिक फी ५ लाख १४ हजार आहे.

इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूल

मुंबईतील जुहूमधील या शाळेची स्थापना १९६८ मध्ये करण्यात आली होती. इथली वार्षिक फी १० लाख ९० हजार आहे.

वेल्हम बॉईज स्कूल

३० एकरातील दून वॅलीजवळील या शाळेची वार्षिक फी ५ लाख ७० हजार आहे.

वुडस्टॉक स्कूल

हे को-एड बोर्डिंग स्कूल मसुरीमध्ये आहे. इथे बारावीची वार्षिक फी १५ लाख ९० हजार आणि नॉन रिफंडेबल डिपॉझिट ४ लाख आहे.

अशाच वेबस्टोरींसाठी

    follow whatsapp