एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नसणार

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यातयेते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशलप्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करूनयाबाबतचे निर्देश दिले […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:59 AM • 08 Jul 2022

follow google news

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यातयेते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशलप्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी दिले आहेत.

हे वाचलं का?

याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करूनयाबाबतचे निर्देश दिले आहेत.

यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्याअशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असेमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतुकरोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळेलोकांना त्रास सहन करावा लागतो.

अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाहीधोका निर्माण होऊ शकतो . त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांनानको, अशी मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘रिक्षावाला’ म्हणून संबोधल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘सामान्य माणूस’ म्हणून आपली प्रतिमाउंचावण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंनीरिक्षावाला म्हणून हिनवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले होते. मर्सिडीज पेक्षा रिक्षा सुसाट धावली…कारण हे सर्वसामान्यांचे सरकार आहे… असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले होते.

    follow whatsapp