माजी पंतप्रधान मनमोहन सिंग Corona Positive

मुंबई तक

• 01:24 PM • 19 Apr 2021

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. मनमोहन सिंग यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना आता एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.रविवारीच मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना संकटाशी लढण्यासाठी पाच सूचना दिल्या होत्या. मात्र आज आता मनमोहन सिंग यांना कोरोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रातल्या कोरोना […]

Mumbaitak
follow google news

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. मनमोहन सिंग यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना आता एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.रविवारीच मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना संकटाशी लढण्यासाठी पाच सूचना दिल्या होत्या. मात्र आज आता मनमोहन सिंग यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये आढळलं डबल म्युटेशन – राजेश टोपे

देशात कोरोना रूग्णसंख्येत रोज भर पडतानाच दिसते आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रूग्णसंख्येने दर दिवशी दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. देशाच्या आरोग्य यंत्रणेवरही ताण येत असल्याचं चित्र आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाच सूचना दिल्या होत्या.

Oxygen Plant: हवेतून दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती, महाराष्ट्रात कुठे सुरु होणार प्लांट?

मनमोहन सिंग यांनी काय दिल्या होत्या सूचना

पहिली सूचना: मनमोहन सिंह यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे की, लसीचे ऑर्डर पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात कसे वितरित केले जातील हे सरकारने सांगितले पाहिजे.

दुसरी सूचना: ‘पारदर्शक सूत्राच्या आधारे ही लस राज्यांमध्ये कशी वाटली जाईल हे सरकारने स्पष्ट करावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी केंद्र सरकार दहा टक्के लसीचा साठा जवळ ठेऊ शकते. पण परंतु उर्वरित लसींबाबत राज्यांना स्पष्ट संकेत मिळाला पाहिजे

तिसरी सूचना: ‘राज्यांना ही सूट दिली पाहिजे की, त्यांनी फ्रंटलाइन वर्कर्सची कॅटेगरी ठरवावी. जरी ते 45 वर्षांपेक्षा कमी असले तरीही त्यांना लस दिली जावी. उदाहरणार्थ, राज्य शालेय शिक्षक, बसेस, तीन चाकी वाहने व टॅक्सी चालक, नगरपालिका व पंचायत कर्मचारी व वकील यांचाही फ्रंटलाइन वर्कर म्हणून समावेश करुन त्यांचे लसीकरण करण्यात यावे.

चौथी सूचना: ‘मागच्या काही दशकात भारत हा सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून पुढे आला आहे. यापैकी बहुतेक वाटा हा खासगी क्षेत्रातील आहे. सध्याच्या सार्वजनिक आरोग्यासाठी आणीबाणीच्या परिस्थितीत भारत सरकारने लस उत्पादकांना मदत केली पाहिजे. जेणेकरून उत्पादन क्षमता वेगाने वाढू शकेल.

पाचवी सूचना: ‘लस देशांतर्गत पुरवठा करणारे मर्यादित आहेत, म्हणून युरोपियन मेडिकल एजन्सी किंवा यूएसएफडीएने मंजूर केलेल्या कोणत्याही लसींना देशात आयात करण्यासाठी मान्यता देण्यात यावी. देशात चाचणी न करता त्यांना यासाठी मान्यता देण्यात यावी. ते म्हणाले की आपत्कालीन परिस्थितीत ही सूट न्याय्य आहे.’

    follow whatsapp