गुलाबरावांचं प्रमोशन, नाराज संजय शिरसाटांना मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा डावललं!

मुंबई: एकनाथ शिंदे गटाची काल मुंबईमध्ये बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये ५ जणांची शिवसेना नेतेपदी तर २६ जणांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुलाबराव पाटलांचे उपनेते पदावरुन नेतेपदी प्रमोशन झाले आहे तर संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक यांना डावलण्यात आलं आहे. काल झालेल्या बैठकीत ‘गर्व से कहो हम […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:13 AM • 14 Sep 2022

follow google news

मुंबई: एकनाथ शिंदे गटाची काल मुंबईमध्ये बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये ५ जणांची शिवसेना नेतेपदी तर २६ जणांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुलाबराव पाटलांचे उपनेते पदावरुन नेतेपदी प्रमोशन झाले आहे तर संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक यांना डावलण्यात आलं आहे. काल झालेल्या बैठकीत ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं घोषवाक्य लिहिलेलं बॅनर लावण्यात आलं होतं. त्यामुळं शिंदे गट आगामी काळात हिंदूत्वाचं रणशिंग फुंकणार हे आता स्पष्ट झालं आहे.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदेंनी केलेल्या नवीन नियुक्त्या

शिवसेना नेतेपदी रामदास कदम, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव, गुलाबराव पाटील यांची निवड झाली आहे. तर उपनेतेपदी २६ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. अनिल बाबर, दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया, श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहाटा, चिमणराव पाटील, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, सदा सरवणकर, राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

काल यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉल झालेल्या बैठकीत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मागच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण ९ विभागप्रमुखांच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेलेले आमदार संजय शिरसाट मंत्रिपदाच्या आशेवर आहेत. या नियुक्तीमध्येही संजय शिरसाटांना डावलण्यात आले आहे. मागच्या मंत्रिमंडळ विस्तार डावलल्यानंतर संजय शिरसाटांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती.

संजय शिरसाटांना उपस्थित केला होता प्रश्न

पहिल्या टप्प्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्यानंतर संजय शिरसाट म्हणाले होती ”अतुल सावेंच्या वडिलांसोबत मी काम केलं. मी काम करताना अतुल सावे राजकारणात कधी येतील हे मला वाटलं नव्हतं. परंतु ते मागुन आले, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्रीही झाले, सगळंच झाले…अरे आमच्याकडेही पहाना जरा…आज काल सिनीयरीटी काही उरली आहे की नाही?”

    follow whatsapp