झाशी (उ. प्रदेश): उत्तर प्रदेशमधील झाशीच्या ओम प्रकाश रायकवारचा मृतदेह गेल्या रविवारी बाबिना पोलीस स्टेशन परिसरातील एका जंगलात सापडला. यावेळी हा मृतदेह रक्ताने माखलेला होता. मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी मृताची ओळख पटवून हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्या. प्रत्यक्षात, ओम प्रकाशची हत्या इतर कोणीही नाही तर त्याच्या स्वतःच्या पत्नी, मेव्हणी आणि मेव्हणीच्या प्रियकराने केली असल्याचं तपासात उघड झालं. ज्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केली.
ADVERTISEMENT
या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक आणि आश्चर्यकारक बाब अशी की, ओम प्रकाश याने 12 वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं. तो फक्त 3 वर्षांपूर्वी झाशीला परत आला होता. पण त्याची पत्नी, मेहुणी आणि मेहुणीच्या प्रियकराने त्याची हत्या केली. या हत्येचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
हे ही वाचा>> पत्नी छतावर तिच्या बॉयफ्रेंडच्या मिठीत, पतीनं रंगेहाथ पकडत धारदार शस्त्राने मुंडकं छाटलं.. आरोपी मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात..
ओम प्रकाशसोबत नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ओम प्रकाश रायकवार हा मूळचा झाशीतील रहिवासी होता. 12 वर्षांपूर्वी त्याने मध्य प्रदेशातील निवारी येथे राहणाऱ्या जयकुंवर नावाच्या तरुणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. नंतर ते दोघेही दिल्लीला निघून गेले. पण साधारण 3 वर्षांपूर्वी तो पुन्हा झाशीला राहण्यासाठी आला होता.
झाशीमध्ये आपल्या घराजवळच असलेल्या नजीकच्या पेट्रोल पंपाजवळील सुलभ कॉम्प्लेक्समध्ये तो काम करत होता. यावेळी त्याची पत्नी जयकुंवर आणि त्याची मुलगी त्याच्यासोबत राहत होती.
हे ही वाचा>> महिला करत होती अंघोळ, तरुणाने खिडकीतून सारं चित्र मोबाईमध्ये केलं कैद, पीडितेनं पाहताच...
मेहुणीसोबत अनैतिक संबंध सुरू झाले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, जयकुंवरची बहीण हरदेवी ही देखील कधी-कधी आपल्या बहिणीच्या घरी येऊ लागली. याचदरम्यान, हरदेवी आणि ओम प्रकाश यांच्यामध्ये अचानक प्रेमसंबंध निर्माण झाले. ज्यानंतर पुढे जाऊन त्यांनी अनैतिक संबंध देखील प्रस्थापित केली. पण काही दिवसांनी या गोष्टीची कुणकुण जयकुंवर हिला लागली. ही गोष्ट जयकुंवरने आपली बहीण हरदेवीचा बॉयफ्रेंड अमर सिंग याला सांगितली. अमर सिंग हा देखील याच परिसरातील सफा गावात राहतो.
तपासात असे दिसून आले आहे की, जेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं तेव्हा ओम प्रकाशने त्याच्या पत्नीलाही मारहाण करायला सुरुवात केलेली. यामुळेच त्याची पत्नी प्रचंड चिडली होती. कारण आधीच पतीचे मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती तिला मिळाली होती. त्यामुळे ती प्रचंड संतापली होती.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृताच्या पत्नीने, तिची बहीण हरदेवी आणि तिचा प्रियकर अमर सिंग यांच्यासोबत मिळून ओम प्रकाशची हत्या करण्याचा कट रचला. कटाचा एक भाग म्हणून जयकुंवर हिने पतीला फसवून गावात बोलावलं आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली.
या संपूर्ण प्रकरणाबाबत बाबिना पोलीस ठाण्याचे प्रभारी तुलसीराम पांडे यांनी माहिती देताना सांगितलं की, घटनेचा खुलासा करताना, आरोपी पत्नी जयकुंवर आणि मेहुणीचा प्रियकर अमर सिंग यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या पोलीस अधिक चौकशी करत आहे.
ADVERTISEMENT
