Personal Finance Tips for Home Loan Interest Rate: घर खरेदी करणे हे एक मोठे स्वप्न असतं आणि परवडणाऱ्या व्याजदराने गृहकर्ज घेतल्याने तुमचे लाखो रुपये वाचू शकतात. सणासुदीचा हंगाम जवळ आला आहे आणि बँका आणि वित्तीय संस्था गृहकर्जांवर आकर्षक ऑफर देत आहेत. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, कोणत्या बँका सर्वोत्तम व्याजदर देत आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबरपर्यंत, 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या गृहकर्जावरील व्याजदर 7.3 टक्के ते 9 टक्के आहेत. हे दर तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न कर यासारख्या घटकांवर अवलंबून असतात. RBI च्या आकडेवारीच्या आधारे या यादीत टॉप बँकांचा समावेश करण्यात आला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्याजदर
कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया सर्वात कमी गृहकर्ज व्याजदर देत आहेत. व्याजदर 7.3 टक्क्यांपासून सुरू होतो आणि 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI सुमारे 39,670 रुपये आहे.
बँक ऑफ बडोदा- बँक ऑफ बडोदाचे गृहकर्ज 7.45 टक्के व्याजदरापासून सुरू होते. 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 40,127 रुपये असेल.
SBI आणि PNB- स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक 7.5 टक्के सुरुवातीच्या दराने कर्ज देत आहेत. 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांच्या कर्जावरील EMI 40,280 रुपये असेल.
खाजगी बँकांचे व्याजदर
ICICI बँक- आयसीआयसीआय बँक 7.7 टक्के व्याजदराने गृहकर्ज देते. 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 40,893 रुपये असेल.
HDFC बँक- खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचा व्याजदर 7.9 टक्क्यांपासून सुरू होतो. 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 41,511 रुपये असेल.
कोटक महिंद्रा बँक- कोटक महिंद्रा बँकेचे गृहकर्ज 7.99 टक्के व्याजदरापासून सुरू होते. 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 41,791 रुपये असेल.
अॅक्सिस बँक- अॅक्सिस बँक 8.35 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. बँकेत 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 42,918 रुपये असेल.
येस बँक- येस बँकेचा व्याजदर 9 टक्के आहे. बँकेत 50 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील EMI 44,986 रुपये असेल.
ADVERTISEMENT
