Personal Finance: तुम्ही Personal Loan घेऊन खरेदी करता फ्रिज, AC किंवा वॉशिंग मशीन, फायदा की नुकसान?

Personal Loan: बँका आणि एनबीएफसी फ्रिज, एसीसारख्या गरजांसाठी Personal Loan देत आहेत, परंतु त्यासाठी 11 ते 20 टक्के व्याजदर आकारला जातो. ईएमआय कार्ड आणि नो-कॉस्ट ईएमआय हे चांगले पर्याय आहेत.

Mumbai Tak

रोहित गोळे

• 12:22 PM • 14 Sep 2025

follow google news

Personal Finance Tips for Personal Loan: आजकाल प्रत्येक घरात नवीन गरजा वाढत आहेत. फ्रिज, वॉशिंग मशीन असो किंवा उष्णतेपासून आराम देणारा AC असो, या सर्वांची मागणी झपाट्याने वाढली आहे. पण प्रश्न असा आहे की, जर खिशात एकरकमी पैसे नसतील तर Personal Loan घेऊन ते खरेदी करणे हा योग्य निर्णय आहे का?

हे वाचलं का?

ही गरज ओळखून, बँका आणि NBFC कंपन्यांनी घरासाठी आवश्यक गॅझेट्स किंवा उपकरणे खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना Personal Loan देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी स्वतंत्र सुरक्षा आवश्यक नाही आणि पैसे थेट खात्यात हस्तांतरित केले जातात. परंतु प्रत्येक सुविधेशी काही धोके देखील जोडलेले आहेत.

Personal Loan मुळे तात्काळ पैसे मिळतात

जर अचानक फ्रिज किंवा एसी खराब झाला आणि नवीन खरेदी करणे आवश्यक असेल, तर  Personal Loan मुळे तात्काळ तुम्हाला या गोष्टी खरेदी करता येतात. ही प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि बहुतेक बँकांमध्ये काही तासांत पैसे खात्यात जमा होतात. EMI मध्ये परतफेड करणे देखील सोपे आहे आणि कोणतेही डाउन पेमेंट आवश्यक नाही.

व्याजदर एक ओझे बनू शकते

पण, ही सुविधा जितकी सोपी आहे तितकीच ती महाग देखील ठरू शकते.  Personal Loan वरील व्याजदर 11 ते 20 टक्क्यांपर्यंत असतात, याचा अर्थ असा की, एका लहान उपकरणासाठी देखील EMI एक मोठं ओझं बनू शकतं. जर तुम्ही आधीच कर्जाचा EMI भरत असाल, तर नवीन  Personal Loan तुमचे बजेट खराब करू शकतं.

EMI कार्ड आणि नो-कॉस्ट EMI हे चांगले पर्याय

अनेक कंपन्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म आता नो-कॉस्ट EMI वर उपकरणे विकत आहेत. यामध्ये कोणतेही व्याज भरावे लागत नाही आणि फक्त उत्पादनाची किंमत हप्त्यांमध्ये भरावी लागते. त्याचप्रमाणे, NBFC चे EMI कार्ड देखील ग्राहकांना सहज व्याजमुक्त EMI सुविधा प्रदान करतात. असे पर्याय  Personal Loan पेक्षा स्वस्त आणि अधिक सोयीस्कर मानले जातात.

    follow whatsapp