'गर्दीचा फायदा घेत मला...' 62 वर्षीय वृद्धाने पीडितेला नको तिथंच हात लावत... दादर स्थानकावर नेमकं काय घडलं?

crime news : गर्दीचा फायदा घेत एका 62 वर्षीय वृद्धाने 19 वर्षीय विद्यार्थिनीला चुकीचा स्पर्श केल्याचा पीडितेनं आरोप केला होता. ही घटना 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता दादर स्टेशनवर घडली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 01:24 PM • 16 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकमधून उतरताना वृद्धाचं तरुणीसोबत वाईट कृत्य

point

दादर स्टेशनवर नेमकं काय घडलं?

Mumbai Crime : लोकल हा मुंबईचा श्वास आहे. याच लोकलमध्ये असंख्य चाकरमानी, शाळकरी विद्यार्थी प्रवास करताना दिसतात. तसेच याच लोकलमध्ये काही हुल्लडबाजी करणारे लोकही असतात. त्यांना कसलंही भान नसतं आणि अनेकदा ते गर्दीचा फायदा घेत महिलांसोबत वाईट कृत्य करताना दिसतात. अशीच एक घटना मुंबईतील दादर स्टेशनवर घडली आहे. गर्दीचा फायदा घेत एका 62 वर्षीय वृद्धाने 19 वर्षीय विद्यार्थिनीला चुकीचा स्पर्श केल्याचा पीडितेनं आरोप केला होता. ही घटना 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता घडली आहे. आरोपीची ओळख आता समोर आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्श शिंदे यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली

रेल्वे दादरला पोहोचली अन् गर्दीचा फायदा घेत...

संबंधित प्रकरणातील आरोपीचं मखाण (वय 62) असे नाव आहे. तो दिल्लीतील रहिवासी असून सध्या ड्रायव्हिंगचं काम करतो. पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर जीआरपी पोलिसांना मखाणला अटक केली. तरुणी ही तिच्या मैत्रिणीसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या फास्ट लोकलच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन जेव्हा दादरला पोहोचली असता, पीडित तरुणी आणि तिची मैत्रिण उतरत होत्या. तेव्हा रेल्वे डब्यात प्रचंड गर्दी होती.

'मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला...'

पोलिसांनी याप्रकरणी सांगितले की, आरोपीने गर्दीचा फायदा घेत मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. या घटनेची पीडितेनं रेल्वे दादर रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली.

हे ही वाचा : महिला करत होती अंघोळ, तरुणाने खिडकीतून सारं चित्र मोबाईमध्ये केलं कैद, पीडितेनं पाहताच....

दरम्यान, तक्रारदार तरुणी ही एक विद्यार्थिनी आहे. आरोपी डीजी मखाणा यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. या एकूण घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणात रेल्वे पोलीस पुढल तपास करत आहे.

    follow whatsapp