अल्पयीन मुलावर तब्बल 14 लोकांकडून लैंगिक अत्याचार! 2 वर्षांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी...

16 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर 2 वर्षांत तब्बल 14 वेगवेगळ्या लोकांनी लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं जात आहे.

अल्पयीन मुलावर तब्बल 14 लोकांकडून लैंगिक अत्याचार!

अल्पयीन मुलावर तब्बल 14 लोकांकडून लैंगिक अत्याचार!

मुंबई तक

• 01:19 PM • 16 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पयीन मुलावर तब्बल 14 लोकांकडून लैंगिक अत्याचार!

point

16 वर्षांच्या मुलावर 2 वर्षांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार...

Crime News: केरळच्या कासरगोड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर 2 वर्षांत तब्बल 14 वेगवेगळ्या लोकांनी लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी 9 जणांना अटक केली असून यात 2 सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलावरील लैंगिक अत्याचाराची ही घटना कासरगोड तसेच कन्नूर आणि कोझिकोड जिल्ह्यात घडली.

हे वाचलं का?

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपींनी LGBTQ समुदायासाठी असलेल्या एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून पीडित मुलाशी ओळख केली. पीडित मुलाशी मैत्री केल्यानंतर आरोपींनी त्याच्यासोबत अतिशय वाईट कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: विद्यार्थीनीवर शारीरिक अत्याचार! 'ते' फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्... पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल

मुलाच्या आईने केली तक्रार दाखल 

एके दिवशी, पीडित तरुणाच्या आईने त्याच्या घरी एका अनोळखी व्यक्तीला पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलाच्या आईला पाहताच ती व्यक्ती तिथून पळून गेली. त्यावेळी, पीडित तरुणाला तिच्या आईने याबद्दल विचारलं असता त्याने त्याच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर, मुलाच्या आईने 'चाइल्डलाइन'ला या प्रकरणाबद्दल सांगितलं आणि पोलिसांनी या घटनेची महिती मिळाली. पोलिसांनी मुलाच्या जबाबाच्या आधारे, 14 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये POCSO अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा: पीडिता मैत्रिणींसोबत शेतात गेली अन् दाजीने पाहिलं, नंतर निर्जनस्थळी नेत मेहुणीवर सामूहिक बलात्कार अन्...

तपासासाठी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम

कासरगोडमधील 8 प्रकरणांचा तपास करण्यासाठी एक उपअधीक्षक आणि 4 निरीक्षकांचा समावेश असलेलं विशेष तपास पथक म्हणजेच स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) तयार करण्यात आलं आहे. कन्नूर आणि कोझिकोडमध्ये घडलेली उर्वरित 6 प्रकरणे तेथील पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत. प्रकरणातील 14 आरोपींचे वय 25 ते 51 वर्षांच्या दरम्यान असल्याचं पोलिसांचं मत आहे. या आरोपींपैकी एक रेल्वे कर्मचारी देखील असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं. केरळ पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक केली असून उर्वरितांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp