Navneet Rana : ‘मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला शनि’; रवि राणा हनुमान चालीसा पठणावर ठाम

मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणावरून मुंबईत जोरदार राडा रंगला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून, मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम आहे. खासदार नवनीत राणा आणि रवि राणा हे कधी घराबाहेर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ समोर आला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:14 AM • 23 Apr 2022

follow google news

मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणावरून मुंबईत जोरदार राडा रंगला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून, मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम आहे.

हे वाचलं का?

खासदार नवनीत राणा आणि रवि राणा हे कधी घराबाहेर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झालेले असताना हा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये आमदार रवि राणा म्हणत आहेत, “हनुमान आणि प्रभु रामचंद्र यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी… ज्या पद्धतीने शेतकरी, शेतमजूर आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला लागलेली शनि, या शनिवारच्या दिवशी, मातोश्री आमचं ह्रदयस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे. त्याठिकाणी जाऊन हनुमान चालीसा वाचणार आहे.”

“महाराष्ट्राच्या शांतीसाठी आजचा बजरंगबलीचा दिवस आहे. हनुमानाचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनि आजच्या दिवशी संपवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली, या उद्देशासाठी जर आमचा विरोध होत असेल. मराठी व्यक्तीला हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखलं जातंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. सत्तेचा दुरुपयोग होतोय.”

“हे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असते, तर आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली असती. महाराष्ट्राला लागलेला शनि संपवण्यासाठी आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं. पोलीस आम्हाला थांबवत आहे. शिवसैनिकांना दारासमोर उभं करून आमच्या विरोधात गुंडागर्दी, हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय.”

राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसैनिक असं चित्र मुंबईत दिसत असतानाच आता मनसेनं यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत हल्ला चढवला आहे. “शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे. एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp