अपघाताच्या आदल्या रात्री दादांना फोन केला होता का? प्रफुल्ल पटेल पहिल्यांदाच बोलले, कॉल करण्याचं कारणही सांगितलं

Praful Patel on Ajit Pawar Plane Crash : दरम्यान, रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवरही प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, " मी फार जबाबदार व्यक्ती असून राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मी फार संयमाने बोलेल. माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाही, तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही" अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

Ajit Pawar,Praful Patel

Ajit Pawar,Praful Patel

मुंबई तक

18 Feb 2026 (अपडेटेड: 18 Feb 2026, 04:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अपघाताच्या आदल्या रात्री दादांना फोन केला होता का?

point

प्रफुल्ल पटेलांचं आरोपांवर स्पष्टीकरण

point

कॉल करण्याचं कारणही सांगितलं

Praful Patel on Ajit Pawar Plane Crash : दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी त्यांना विदर्भातील एका नेत्याने फोन केला होता, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहेत. काही नेत्यांनी कोणत्याही नेत्याचं स्पष्टपणे नाव न घेता विदर्भातील नेत्याने फोन केला होता, असे आरोप केले होते. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल पहिल्यांदाच बोलले आहेत. दरम्यान, अजितदादांना कोणत्या कारणासाठी फोन केला होता? याबाबतही Praful Patel यांनी भाष्य केलंय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : केबिनमध्ये बोलवून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, नामांकित शाळेतील प्रकार; मुख्याध्यापकाला पालकांनी दिला चोप

अपघाताच्या आदल्या रात्री दादांना फोन केला होता का? पटेल पहिल्यांदाच बोलले

प्रफुल्ल पटेल म्हणाले, "मी माननिय अजितदादाला आदल्या रात्री फोन केला होता. मला माहिती नव्हतं की, अजितदादा मुंबईत आहेत? बारामतीत आहेत? की आणखी कुठे आहेत.. मी मोबाईलवरुन त्यांच्याशी संपर्क केला. पूर्व विदर्भात धान पिकवणारा शेतकरी आहे, ज्यांची शासकीय खरेदी हमीभावाने आपण करतो. यांचे पैसे केंद्र सरकारकडून राज्यसरकारला परत मिळतात.. ते पैसे अजून शेतकऱ्यांना द्यायची बाकी आहेत. शेतकऱ्यांची ओरड आहे. शेतकऱ्यांनी तालुका स्तरावर यासंदर्भात काही निदर्शने केले होते. हे मी त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यामध्ये गैर काय आहे? शेतकऱ्यांचा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणे हे माझं कर्तव्य होतं. मी फक्त त्यांना माहिती दिली. ते मला म्हणाले, प्रफुल भाई शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळतील, यासाठी काहीतरी करतो. त्यानंतर त्यांनी काय केलं? हे मला माहिती नाही. हे खरंय की मी फोन केला होता. शेतकऱ्यांच्यासाठी केला होता. खासगी फाईलसाठी नाही. अर्थमंत्री असल्याने त्यांना अनेक लोकांचा फोन आला असेल. याचा अर्थ असा नाही की, मी त्यांना तिथे थांबवण्याचं काम केलंय. मी दिल्लीत होतो. मला ते मुंबईत आहेत, हे देखील माहिती नव्हतं. 

दरम्यान, रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवरही प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, " मी फार जबाबदार व्यक्ती असून राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मी फार संयमाने बोलेल. माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाही, तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही" अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची एनसीपीची मागणी - पटेल 

अजितदादाचं सोडून जाणे ही फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या सखोल तपास विविध यंत्रणेद्वारे होत आहे .राज्य सरकार सुद्धा तपास करत आहे. परंतु यामध्ये अनेक लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. अचानकपणे एवढी मोठा दुर्घटना कशी होऊ शकते, याची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. ही घटना महाराष्ट्रात घडल्यामुळे महाराष्ट्र सरकार याबाबत सीबीआयला चौकशी करण्यात सांगू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही काल निवेदन देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी सांगितले..
 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

केबिनमध्ये बोलवून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, नामांकित शाळेतील प्रकार; मुख्याध्यापकाला पालकांनी दिला चोप
 

    follow whatsapp