रस्त्यांचे झाले कालवे, घरांमध्ये पाणी, राम नदीला पूर; पुणे परिसरात तुफान पाऊस

मुंबई तक

• 03:15 PM • 11 Sep 2022

पुणे शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या तुफान पावसामुळे काही भागांतील रस्त्यांचे कालवे झाले. तर अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. नालेही भरून वाहत असून, राम नदीचं पात्रही दुथडी भरुन वाहू लागलं आहे. पुणे शहर आणि परिसरात रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर जास्त […]

Mumbaitak
follow google news

पुणे शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या तुफान पावसामुळे काही भागांतील रस्त्यांचे कालवे झाले. तर अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. नालेही भरून वाहत असून, राम नदीचं पात्रही दुथडी भरुन वाहू लागलं आहे.

हे वाचलं का?

पुणे शहर आणि परिसरात रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्यानं काही वेळातच अनेक ठिकाणी पुण्यातील अनेक रस्ते आणि नाले, ओसंडून वाहू लागले.

पुण्यात मुसळधार पाऊस : पाच फूटापर्यंत साचलं पाणी

अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे बावधन परिसरामध्ये हाहाकार उडाला होता. महत्त्वाचं म्हणजे राम नदीच्या पात्रही दुथडी भरून वाहू लागलं. या पावसामुळे पुण्यातील बावधन गावात, खोलगट भागांमध्ये अनेक घरात पाणी शिरलं. काही ठिकाणी तर पाच फूटापर्यंत पाणी जमा साचलं होतं.

रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, परिसरात बंद करून उभ्या असलेल्या चारचाकी कार सुद्धा ३० ते ४० फूट लांबपर्यंत वाहून गेल्या.

पुणे-कोकण, पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर भिंत कोसळली

पुणे-कोकण या महामार्गावरून पुणे-मुंबई महामार्गाला लागणाऱ्या मधल्या रस्त्यावर दुर्घटना घडली. रियान इंटरनॅशनल शाळेलगत असलेली भिंत कोसळून हा रस्ता बंद झाला होता, परंतु स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या सह्यानं तातडीने हा रस्ता पुन्हा मोकळा केला.

या रस्त्यावरून राम नदीचे पाणी वाहत असल्यानं पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत, हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या काही चार चाकी तशाच मध्ये अडकलेल्या असून, एक दुचाकीस्वार वाहून जाताना थोडक्यात बचावला.

राम नदीला पूर

राम नदी ही मागील काही वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली. बावधनकरांना बऱ्याच वर्षांनंतर राम नदीचं रौद्रवतार बघायला मिळाला. बावधन गावामध्ये अनेक बांधकामे झाली आहेत, त्यामुळे जुने ओढून आले यांची दिशा बदलून टाकले आहे. यामुळे पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याचं सांगितलं जातंय.

पुण्यातील कोणत्या भागांमध्ये साचले पाणी

१) चंदननगर पोलिस स्टेशन

२) वेदभवन, कोथरुड

३) वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड

४) लमाण तांडा, पाषाण

५) सोमेश्वर वाडी, पाषाण

६) वानवडी, शितल पेट्रोल पंप

७) बी टी ईवडे रोड

८) काञज उद्यान

कोणत्या परिसरात झाडं पडली?

१) एनसीएल जवळ पाषाण

२) साळुंखे विहार, कोंढवा

३) ज्योती हॉटेल जवळ कोंढवा

४) चव्हाणनगर

५) रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन

    follow whatsapp