सैराट…. बहिणीच्या नवऱ्याची निर्घृण हत्या, जीव जाईपर्यंत करत होते डोक्यात रॉडने वार

मुंबई तक

06 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

हैदराबाद: तेलंगणातील सरूर परिसरात एक ऑनर किलिंगची अत्यंत भयंकर घटना घडली आहे. नागराज नावाचा युवक आपल्या पत्नीसह दुचाकीवरून जात असताना त्याच्या पत्नीच्या भावाने त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या घडवून आणली. या घटनेनंतर संपूर्ण तेलंगणामध्ये तणावाचे वातावरण आहे. मृत नागराजच्या नातेवाईकांनी या घटनेच्या विरोधात निदर्शने करत हत्येमागे नागराजच्या पत्नीच्या कुटुंबाला जबाबदार धरले आहे. नागराजने चार महिन्यांपूर्वी 23 […]

Mumbaitak
follow google news

हैदराबाद: तेलंगणातील सरूर परिसरात एक ऑनर किलिंगची अत्यंत भयंकर घटना घडली आहे. नागराज नावाचा युवक आपल्या पत्नीसह दुचाकीवरून जात असताना त्याच्या पत्नीच्या भावाने त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या घडवून आणली.

हे वाचलं का?

या घटनेनंतर संपूर्ण तेलंगणामध्ये तणावाचे वातावरण आहे. मृत नागराजच्या नातेवाईकांनी या घटनेच्या विरोधात निदर्शने करत हत्येमागे नागराजच्या पत्नीच्या कुटुंबाला जबाबदार धरले आहे.

नागराजने चार महिन्यांपूर्वी 23 वर्षीय सय्यद अश्रीन सुल्ताना (पल्लवी) सोबत लग्न केले होते. नागराजच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोघेही कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांवर प्रेम करत होते. काही महिन्यांपूर्वीच जुन्या शहरातील आर्य समाज मंदिरात दोघांचा विवाह झाला होता.

नागराज हिंदू आणि त्याची पत्नी मुस्लिम असल्याने त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी नागराजची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. मृतक, 25 वर्षीय बिलापुरम नागराजू, सिकंदराबादमधील मरेडपल्ली येथे राहत होता आणि जुन्या शहरातील मलकपेट येथील कार शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करत होता.

हत्येचा Video आला समोर

दरम्यान आता या भीषण हत्याकांडाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये नागराजूची हत्या करणारा हा सुल्तानाचा भाऊ असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सुल्ताना तिच्या भावाला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मारेकरी तिला दूर ढकलून देतात आणि जमिनीवर पडलेल्या नागराजूच्या डोक्यावर सतत वार करत राहतो. या सगळ्याचा व्हिडिओ कुणीतरी टेरेसवरून शूट केला होता जो आता व्हायरल होत आहे.

ही घटना बुधवार, 4 मे रोजी हैदराबादच्या सरूरनगरमध्ये घडली होती. नागराजू नावाच्या व्यक्तीचा त्याच्याच मेव्हण्याने भर रस्त्यात खून केला.

…म्हणून त्यांनी केली नागराजूची हत्या

नागराजूने दोन महिन्यांपूर्वी 31 जानेवारी रोजी 23 वर्षीय सुलताना (उर्फ पल्लवी) हिच्याशी लग्न केले. नागराजू हा दुसऱ्या धर्माचा असल्याने सुलतानाचे कुटुंबीय त्याच्यावर नाराज होते. याच कारणावरून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचं आता बोललं जात आहे. याप्रकरणी सुलतानाच्या दोन भावांना (सय्यद मोबीन अहमद आणि मोहम्मद मसूद अहमद) अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाबाबत नागराजूच्या एका नातेवाईकाने आरोप केला आहे की, दोघेही (सुलताना आणि नागराजू) कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. या दोघांचा काही महिन्यांपूर्वी जुन्या शहरातील आर्य समाज मंदिरात विवाह झाला होता. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते, त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी नागराजूची हत्या केली.

पतीच्या हत्येनंतर सुल्तानाने रडत रडत घडलेला प्रकार सांगितला. ती म्हणाली, ‘मारेकर्‍यांकडून मी माझ्या पतीच्या जीवाची भीक मागत राहिली. पण त्यांनी माझ्या पतीला चाकूने भोसकले. माझ्या डोळ्यासमोरच त्यांनी माझ्या नवऱ्याची हत्या केली.’

औरंगाबाद: ‘माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं’, पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा

मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी सुल्तानाच्या भावाने नागराजूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा त्याला नागराजूचा शोध लागला नव्हता . मात्र 4 मे रोजी आरोपींनी नागराजूचा पाठलाग करून पंजाला अनिल कुमार कॉलनी, सरूरनगर येथे गाठलं आणि त्यानंतर आरोपींनी नागराजूची लोखंडी रॉड आणि चाकूने हत्या अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

    follow whatsapp