Govt Job: 12वी उत्तीर्णांसाठी भरघोस पगाराची नोकरी; भारतीय नौदलात 40 जागांवर भरती!

Job Vaccancy 2024 : भारतीय नौदलात (Indian Navy) 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2025) या पदासाठी एक्झिक्युटिव्ह अँड टेक्निकल ब्रांचमध्ये एकूण 40 जागांसाठी नोकरीची संधी आहे.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

• 01:07 PM • 10 Jul 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय नौदलात 40 जागांसाठी नोकरीची संधी आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार 20 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

परीक्षेविषयीची माहिती नंतर कळवण्यात येईल.

Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात (Indian Navy) 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2025) या पदासाठी एक्झिक्युटिव्ह अँड टेक्निकल ब्रांचमध्ये एकूण 40 जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 20 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेविषयीची माहिती नंतर कळवण्यात येईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (indian navy recruitment 2024 high paying job for 12th pass in PCM )

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार, 

  • 12वी उत्तीर्ण (पीसीएम : 70% गुण, एसएससी/ एचएसची इंग्रजी : 50% गुण) 
  • जेईई (मेन्स)-2024 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

हेही वाचा : Vidhan Sabha Election : '...तर 288 उमेदवार पाडले म्हणून समजा', जरांगेंनी थोपटले दंड

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 19 ते 16 वर्षांपर्यंत (02 जुलै 2005 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान) असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

हेही वाचा : Worli Accident : मोबाईल सुरु केला अन्...; मिहीर शाहाला पोलिसांनी कसे पकडले?

 

अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

हेही वाचा : Orry: अंबानींच्या पार्टीत वडापावच्या प्लेटमध्ये ओरीला आढळला केस; पोस्ट केला व्हिडीओ!

 

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1e_OOLS6HqBXX6ALJV46otIgRloEeUIA3/view?usp=sharing

    follow whatsapp