Orry: अंबानींच्या पार्टीत वडापावच्या प्लेटमध्ये ओरीला आढळला केस; पोस्ट केला व्हिडीओ!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर ओरीने इटलीमधील अंबानींच्या पार्टीचा व्लॉग पोस्ट केला आहे.

point

ओरीला वडापावच्या प्लेटमध्ये केस आढळला.

point

व्लॉगमधून ओरीने ही माहिती दिली आहे.

Orry Viral News :  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी इटलीमध्येही त्यांचे एक प्री-वेडिंग फंक्शन पार पडले. यावेळी शाहरुख खान, जान्हवी कपूर, सारा अली खानसह अनेक बॉलिवूड तसेच हॉलिवूड सेलिब्रिटींनी या क्रार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान, सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर ओरहान अवत्रमणी म्हणजेच ओरीने इटलीमधील या पार्टीचा आता व्लॉग पोस्ट केला आहे. यासर्वात चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे ओरीला प्लेटमध्ये आढळलेला केस...  (bollywood orry found hair in anant ambani and radhika merchant pre-wedding function in itlay portofino)

ओरीच्या वडापाव प्लेटमध्ये आढळला केस!

व्लॉगमधून ओरीने खाद्यपदार्थांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणि सेलिब्रिटींची उपस्थिती याबद्दल माहिती दिली आहे. ओरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहुणे एका स्टॉलवरून दुसऱ्या स्टॉलवर जात विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. यावेळी ओरीसुद्धा चीज बॉल्स, पास्ता आणि इतर पदार्थांचा आस्वाद घेत आहे.

हेही वाचा : Worli Accident : मोबाईल सुरु केला अन्...; मिहीर शाहाला पोलिसांनी कसे पकडले?

यानंतर ओरी, मैत्रीण तानिया श्रॉफसोबत एका वडापावच्या स्टॉलवर जातो. ‘पोर्तोफिनोमधील सर्वोत्कृष्ट वडापाव’ असं म्हणत ओरी आणि तानिया वडापाव टेस्ट करतात. वडापावचा एक घास खाल्ल्यानंतर तानिया म्हणते की, “त्यात केस दिसतोय. मला अजून एक घास खायचा होता पण त्यात केस आहे.” आता या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra Weather Forecast : मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू झाले. फेब्रुवारीमध्ये अंबानी कुटुंबाच्या मूळ गावी जामनगरमध्ये तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि त्यानंतर युरोपमध्ये क्रूझ पार्टी झाली. युरोपमधील चार दिवस चाललेल्या क्रूझ पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT