NoroVirus : केरळात नोरोव्हायरसचे आढळले 13 रुग्ण; काय आहेत लक्षणं?

देशातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचं दिलासादायक चित्र असताना आता केरळातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली. केरळात एका पशु वैद्यकीय महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना संसर्गाचा प्रचंड वेग असलेल्या नोरोव्हायरसची लागण झाली आहे. वायनाड जिल्ह्यातील विथिरी परिसरात पुकोडे गावात हा विषाणू आढळून आला आहे. 13 विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांपूर्वी नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. नोरोव्हायरसचा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:36 AM • 14 Nov 2021

follow google news

देशातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचं दिलासादायक चित्र असताना आता केरळातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली. केरळात एका पशु वैद्यकीय महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना संसर्गाचा प्रचंड वेग असलेल्या नोरोव्हायरसची लागण झाली आहे. वायनाड जिल्ह्यातील विथिरी परिसरात पुकोडे गावात हा विषाणू आढळून आला आहे.

हे वाचलं का?

13 विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांपूर्वी नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. नोरोव्हायरसचा प्रसार झाल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही. या विषाणूबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणं आणि पशु वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची माहिती जमा करण्याचं काम केलं जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

सर्वात आधी महाविद्यालयाच्या परिसराबाहेर असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आल्याचं पशु वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितलं. त्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने विद्यार्थ्यांचे नमुने घेतले आणि अलाप्पुझा येथील एनआयव्ही (NIV) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. रिपोर्ट आल्यानंतर नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याचं निप्षन्न झालं. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

नोरोव्हायरसची लक्षणं काय?

नोरोव्हायरसचा संसर्ग दूषित अन्न व पाणी, त्याचबरोबर बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं पसरतो. नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर अनेक लक्षणं दिसून येतात. त्यापैकी उलट्या (मळमळ) आणि जुलाब होणं ही या विषाणूची प्रमुख लक्षणं आहेत. याबरोबरच रुग्णाला प्रचंड ताप येतो, अंगदुःखी, पोटात (जठर, उदराचा भाग) त्रास होतो.

कुणाला संसर्ग होण्याचा धोका अधिक?

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार या विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, नोरोव्हायरसचा संसर्ग झालेला व्यक्ती लाखो लोकांना बाधित करू शकतो. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. निरोगी असलेल्या लोकांना नोरोव्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका काहीअंशी कमी असून, सहव्याधी असलेले, वयोवृद्ध आणि लहान मुलांना याचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.

    follow whatsapp