Laxmi Pooja 2021: लक्ष्मीपूजनानिमित्त शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes

मुंबई तक

• 02:32 PM • 04 Nov 2021

Laxmi Pooja 2021 whatsapp Marathi wishes and Messages: दिवाळी (Diwali) सणामधील सर्वात महत्त्वाचा मुहूर्त हा लक्ष्मीपूजनचा असतो. दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा सण हा हाच असतो. याच दिवाशी खऱ्या अर्थाने घरोघरी दिवाळी सण साजरा केला जातो. यंदा लक्ष्मीपूजन (Laxmi Pooja) 4 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीची खास पूजा-अर्चा केली जाते. दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनच्या दिवसाला खूपच […]

Mumbaitak
follow google news

Laxmi Pooja 2021 whatsapp Marathi wishes and Messages: दिवाळी (Diwali) सणामधील सर्वात महत्त्वाचा मुहूर्त हा लक्ष्मीपूजनचा असतो. दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा सण हा हाच असतो. याच दिवाशी खऱ्या अर्थाने घरोघरी दिवाळी सण साजरा केला जातो. यंदा लक्ष्मीपूजन (Laxmi Pooja) 4 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीची खास पूजा-अर्चा केली जाते.

हे वाचलं का?

दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनच्या दिवसाला खूपच महत्त्व आहे. दरवर्षी या दिवशी अनेक ठिकाणी दिवाळ पहाटचं आयोजन केलं जातं. पण कोरोना संकटामुळे यंदाही दिवाळी पहाट किंवा तत्सम कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार नाहीत. दरम्यान, जरी दिवाळी पहाट साजरी केली जाणार नसेल तरी आपण आपल्या मित्रमंडळींना लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा नक्कीच देऊ शकता.

लक्ष्मीपूजनच्या दिवशी धन, लक्ष्मी आणि गणपतीची विशेष पूजा केली जाते. तसेच यावेळी धनदेवता कुबेराची सुद्धा पूजा केली जाते. घरात कायम लक्ष्मीचा वास असावा अशी या दिवशी प्रार्थना केली जाते. म्हणूनच अनेक जण यथासांग ही लक्ष्मीची पूजा करतात.

लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपल्या हिशोबाची वही बदलतात. पूजेआधी त्या वहीवर ते केसरयुक्त चंदनाने किंवा कुंकूने स्वस्तिक काढून त्याची यथोचित पूजा करतात. यालाच चोपडी पूजन म्हटलं जातं. या सोबतच लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचं देखील पूजन केलं जातं. याच वेळी लक्ष्मीपूजन देखील केलं जातं.

लक्ष्मीपूजन सणाचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने अनेक शुभकार्य देखील पार पडतात. अशा या सणाला अनेक जण खास शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी देखील जातात. पण सध्याच्या काळात हे अनेकांना शक्य होतं नाही. म्हणून अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शुभेच्छा पाठवतात. आपणही आपल्या आप्तेष्टांना आणि मित्र-परिवाराला या खास शुभेच्छा पाठवू शकतात.

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मी आली सोनपावली

उधळण झाली सौख्याची

धन-धान्यांच्या राशी भरल्या

घरी नांदू दे सुख-समृद्धी!

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

आनंदाची उधळण करणारा हा सण आपणा सर्वांस भरभरून आनंद, प्रेम व उत्साह देवो!

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

हा दीपोत्सव सर्वांच्या जीवनातील अंधकार दूर करणारा, विवेक – प्रकाश पसरवणारा व मंगलदायी होवो!

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो!

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

आज दीपावली लक्ष्मीपूजन ! लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य रहावा.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

सध्या कोरोनाचं संकट कमी झालेलं असलं तरी ते पूर्णपणे संपलेलं नाही. त्यामुळे सरकारकडून काही निर्बंध कायम आहेत. अशात जर आपल्याला कोरोनाचा समूळ नायनाट करायचा असेल तर सरकारकडून जारी करण्यात आलेले नियम पाळणं गरजेचं आहे. त्यातही महत्त्वाचा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी जर आपण जर बाहेर पडू शकत नसाल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Happy Naraka Chaturdashi 2021: नरक चतुर्दशीनिमित्त Facebook-Whatsapp मेसेज, Wishes आणि शुभेच्छा

सोशल मीडियामुळे आता आपल्याला शुभेच्छा पाठविण्यसाठी WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याचद्वारे आपण Messages आणि Wishes पाठवू शकतात. यासाठी काही खास मराठी शुभेच्छा असलेले कार्ड (Laxmi Pooja 2021 wishes and Quotes) आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छा मेसेज आपण एकमेकांना पाठवू शकतात.

नरक चतुर्दशीच्या आणि लक्ष्मीपूजन सणानिमित्त ‘मुंबई तक’कडून देखील आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा!

    follow whatsapp