Maharashtra HSC Result 2021: 12वीचा निकाल ‘इथे’ पाहा, mahresult.nic.in वरुन करा मार्कशीट डाऊनलोड

मुंबई तक

• 04:06 AM • 03 Aug 2021

Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2021 परीक्षेच्या निकालाची (Maharashtra board HSC result 2021) तारीख जाहीर केली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होईल. हा निकाल देखील ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येईल. कोरोनाच्या संकटामुळे यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. […]

Mumbaitak
follow google news

Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2021 परीक्षेच्या निकालाची (Maharashtra board HSC result 2021) तारीख जाहीर केली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होईल.

हे वाचलं का?

हा निकाल देखील ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येईल. कोरोनाच्या संकटामुळे यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. म्हणून अंतर्गंत मूल्यमापन याआधारे निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे.

बारावी इयत्तेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट आणि mahresult.nic.in, result.mh-ssc.ac.in या वेबसाइटवर पाहता येईल. याशिवाय अधिक माहितीसाठी विद्यार्थी MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट देखील पाहू शकतात.

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021 ची लिंक अधिकृत https://msbshse.co.in अॅक्टिव्हेट केली जाईल. बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर वेगवेगळ्य वेबसाइटवर निकाल जाहीर होतील.

HSC Result 2021: निकाल या वेबसाइटवर पाहता येणार (List of Websites for Result)

HSC Result 2021 – निकाल नेमका कसा पाहाल?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल https://msbshse.co.in/ यावर जाहीर करणार आहे.

नेमका निकाल कसा पाहता येणार?

  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन

  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.

  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.

  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.

  • समजा, तुमचा सीट नंबर M787671 असेल आणि तुमच्या आईचे नाव ‘संगिता’ असं असेल तर तुम्ही M787671 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SAN असं टाकावं लागेल.

  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.

Maharashtra HSC Result 2021:’MSBSHSE’: बारावीच्या निकालाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

2020 साली बारावीचा किती टक्के निकाल लागला होता?

मागील वर्षी 16 जुलै 2020 रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. (Maharashtra HSC result 2021) गेल्या वर्षी राज्याचा बारावीचा निकाल 90.66% एवढा लागला आहे. या निकालात नेहमी प्रमाणेच मुलींनी बाजी मारली होती. मागील वर्षी 93.88 टक्के विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या होत्या. तर 88.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

2020 शाखानिहाय निकाल नेमका कसा होता? (HSC Result : Streamwise Result)

  • कला (Arts) – 82.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते

  • वाणिज्य (Commerce) – 91.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले

  • विज्ञान (Science) – 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

  • व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 86.07 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते.

    follow whatsapp