'दिल्लीत दोघेजण भेटले आणि त्यांनी 160 जागांची गॅरंटी दिली अन्...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

sharad pawar press conference : राहुल गांधींनी घेतलेली पत्रकर परिषद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी नागपूर येथे 9 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली.

sharad pawar

sharad pawar

योगेश पांडे

09 Aug 2025 (अपडेटेड: 09 Aug 2025, 03:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांची नागपूरात पत्रकार परिषद

point

पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट

Sharad pawar press Conference : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतांच्या चोरीबाबत प्रश्न उपस्थित केलेत. राहुल गांधींनी घेतलेली पत्रकर परिषद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी नागपूर येथे 9 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : नवरा गेला नदीवर अंघोळ करायला, बॉयफ्रेंडनं पत्नीला गाडीत बसवलं अन्...पती आला रडकुंडीला

निवडणूक आयोगाबाबत आम्हाला कसलीही शंका नसल्यानं आम्ही त्याकडे दुर्लक्ष केल्याचं शरद पवार म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी दोन लोकांची भेट घेतली, त्यानंतर 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी देण्यात आली, असे शरद पवार म्हणाले. त्या दोन लोकांची भेट राहुल गांधींना घालून दिली होती. आम्ही दोघांनीही जनतेत जाऊन जनता जो कौल देईल तो स्वीकारण्याचे ठरवलं. तसेच त्या माणसांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीत काही लोक भेटले. त्यांची नांवं, पत्ता माझ्याकडे नाही. मी त्याकडे दुर्लक्ष केलंय. मला त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या एकूण 288 जागा आहेत, त्यातील 160 जागा आम्ही तुम्हाला जिंकून देऊ अशी गॅरंटी दिली होती. मला याचं आश्चर्य वाटलं. स्पष्टपणे सांगायचं झालं, तर त्यांनी जे गॅरंटीबाबत सांगितलं. पण, मला निवडणूक आयोगाबाबत किंचितशीही शंका वाटत नाही. असे लोक भेटतच असतात, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष केल्याचे शरद पवार म्हणाले. 

हे ही वाचा : घरातच नग्न अवस्थेत सापडला मॉडेलचा मृतदेह... शरीरावरचे 'ते' निशाण अन् सर्वच...

हा आपला रस्ता नाही..

त्यानंतर पुढे ते म्हणाले की, त्या संबंधित दोघांची राहुल गांधी यांना मी भेट घालून दिली होती. त्या दोघांना जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधींना सांगितलं. तेव्हा राहुल गांधीचं आणि माझं मत असं झालं की आपण याकडे दुर्लक्ष करावे. हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्यात जाऊन लोकांचा जो निर्णय आहे तो स्विकारू, असे शरद पवार म्हणाले.

    follow whatsapp