Viral News : नुकत्याच जन्मलेल्या 23 दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकाने आपल्या दोघांच्यामध्ये आपल्या जन्मलेल्या बाळाला झोपवले होते. तेव्हा बाळाला दोघांमध्ये झोपवण्यात आलेलं बाळ गुदमरले आणि याचमुळे त्याचा मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील असल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : विधवेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप, घरात सीसीटीव्ही कॅमेरे, महिलेच्या मुलीसोबत... अखेर प्रियकराचा गळा चिरून अंत
पालकांनी आपल्या कुशीत नवजात बाळाला झोपवले नंतर...
पालकांनी नवजात बाळाला झोपवण्यासाठी आपल्याच कुशीत घेतले होते. काही वेळानं दोघांनाही जाग आली असता, आपलं बाळ का हलत नाही? असा प्रश्न त्यांना उपस्थित झाला. बाळाने डोळे मिटले होते, ते आवाज करत नव्हते. त्यांनी नवजात बाळाला बलवण्याचा प्रयत्न केला तरीही ते हलले नाही. दोन्ही पालकांच्या कुशीत झोपलेल्या बाळाचे निधन झाल्याचे मन हेलावणारे वृत्त समोर आले.
श्वास गुदमरल्याने अवघ्या 23 दिवसांच्या बाळाचा दुर्दैवी अंत
पालक झोपल्यानंतर आपल्या मुलाचा श्वास गुदमरेल हे त्यांना जाणवले नाही. श्वास गुदमरल्याने अवघ्या 23 दिवसांच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला होता. कुटुंबाने ताबडतोब बाळाला आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नवजात बाळाला मृत घोषित केले होते. या घटनेनं पालकांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. महत्त्वाची बाब म्हणजे बाळासाठी पती-पत्नी हे लहान बाळाची अनेक वर्षांपासून वाट बघत होते. पण, अखेर महिलेनं जन्म दिलेल्या बाळाचा अंत झाला.
हे ही वाचा : जळगावात बेडकामुळे रिक्षा एकमेकांवर आदळून पलटी झाल्या, ड्रायव्हरसह पाच जण गंभीर जखमी
डॉक्टरांचे म्हणणे आहे की थंडीच्या काळात अशा बेडबग्सच्या घटना अधिक आढळतात, त्यामुळे या हंगामात नवजात बालकांच्या पालकांनी सतर्क राहावे.
ADVERTISEMENT











