जळगावात बेडकामुळे रिक्षा एकमेकांवर आदळून पलटी झाल्या, ड्रायव्हरसह पाच जण गंभीर जखमी
Jalgaon Accident : एका बेडकाने 2 रिक्षांचा अपघात घडवल्याचे वृत्त आता समोर आले आहे. ही घटना जळगावात घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बेडकामुळे रिक्षाचा अपघात
बेडूक बाहेर फेकताना जळगावात घडला प्रकार
Jalgaon Accident : एका बेडकाने 2 रिक्षांचा अपघात घडवल्याचे वृत्त आता समोर आले आहे. बेडूक बाहेर काढण्याच्या प्रयत्नातूनच चालकाचा रिक्षावरील ताबा सुटला आणि अपघात झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना जळगावातील अंबाडी शिरसाड मार्गावरील उसगाल येथे घडली. तसेच दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाल्याने दोन रिक्षाचालकांसह पाच प्रवासी गंभीरपणे जखमी झाल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : या' राशीतील लोकांच्या प्रेमसंबंधात रोमान्स वाढेल, काही राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस
बेडूक बाहेर फेकताना प्रवाशाचा अंगावर पडला
रिक्षामध्ये बेडूक आढळून आल्याने महिला प्रवासी भयभीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रिक्षा ड्रायव्हरने बेडूक बाहेर फेकताना तो प्रवासाच्या अंगावर पडल्याचे वृत्त आहे. हा प्रसंग अनुभवून महिला घाबरल्या आणि घटनास्थळी गोंधळ माजला. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातात दोन्ही रिक्षा पलटी
या बेडकाच्या नादात दोन्ही रिक्षांनी एकमेकांना धडक दिली होती. या धडकेत दोन्ही रिक्षा पलटी झाल्या. या अपघातात दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वसईकडे हलवण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : आईच्या जातीच्या आधारे मुलीला SC प्रमाणपत्र दिलं, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; महत्त्वाचं निरीक्षणही नोंदवलं
धडकेत रिक्षांचा चेंदामेंदा
एका बेडकामुळे दोन रिक्षांचा चेंदामेंदा झाल्याचे हे वृत्त आहे. ही घटना अतिशयोक्ती वाटत असली तरी तितकीच गंभीर बाब समोर आली आहे. यात पाच जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.










