Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून नात्यांना काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्याच दिरावर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या आरोपानुसार, दिराने अनेकदा तिचे कपडे फाडून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
ADVERTISEMENT
दिराचं घृणास्पद कृत्य
हे प्रकरण गोरखपूर पोलीस स्टेशनमधील असल्याची माहिती आहे. येथे राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेने आपल्याच दिरावर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिच्या दिराची तिच्यावर वाईट नजर आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती कामानिमित्त बऱ्यादा बाहेर असतो. दरम्यान, तिचा दीर तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो.
हे ही वाचा: जोडप्याचा गाडीतील प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल, टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याचं संतापजनक कृत्य! महिला आणि तरुणींना सुद्धा टार्गेट...
बळजबरीने खोलीत नेऊन संबंध ठेवण्याचा प्रयत्न
महिलेच्या आरोपानुसार, दिराला संधी मिळताच तो खोलीत तिच्यासोबत घृणास्पद करतो. त्याने बऱ्याचदा तिला अयोग्यरित्या स्पर्श केला आहे. पीडितेने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता आरोपी दीर घरात आला. त्यानंतर, पीडिता घरात एकटी असल्याचं पाहून त्याने तिला बळजबरीने खोलीत नेलं आणि तिचे कपडे फाडले.
हे ही वाचा: पालघर हादरले! चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीवर पोलीस हवालदारानेच केला बलात्कार
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने आरोपीच्या घाणेरड्या कृत्याला विरोध केला असता त्याने पीडितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी, कशीबशी दिराच्या तावडीतून सुटून बाहेर आली आणि लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आरोपी दीर सध्या, फरार असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











