एक्सप्रेस वेवर कारमध्ये जोडप्याचे शारीरिक संबंध... 'या' व्यक्तीने 'तो' व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून गाडीतील जोडप्याचे खाजगी क्षणांचे व्हिडिओ फुटेज काढून नंतर ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं संतापजनक कृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

'तो' व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप

'तो' व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप

मुंबई तक

• 03:32 PM • 09 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

एक्सप्रेस वेवर कारमध्ये जोडप्याचे शारीरिक संबंध...

point

'या' व्यक्तीने 'तो' व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप

Crime News: उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथे पूर्वांचल महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली.  टोल प्लाझावरील अँटी-ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम (एटीएमएस) च्या मॅनेजरवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून गाडीतील जोडप्याचे खाजगी क्षणांचे व्हिडिओ फुटेज काढून नंतर ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं संतापजनक कृत्य केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, आरोपीने या कृत्यातून प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळल्याचा देखील आरोप आहे. ही घटना हलियापूर पोलिस स्टेशन परिसरात घडली. पूर्वांचल एक्सप्रेसवे टोल प्लाझावर एटीएमएस सिस्टम बसवण्यात आली असून या सिस्टमवर देखरेख ठेवण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. 

हे वाचलं का?

जोडप्यांचे गाडीतील प्रायव्हेट व्हिडीओ फुटेज व्हायरल 

पूर्वांचल महामार्गावरून जाणाऱ्या एका गाडीतील नवविवाहित जोडप्याचा खाजगी व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. एटीएमएस सिस्टिमचा मॅनेजर आशुतोष विश्वास याच्यावर हे अतिशय संतापजनक कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित आरोपी सीसीटीव्हीमधून जोडप्यांचे गाडीतील प्रायव्हेट व्हिडीओ फुटेज काढून, त्या व्हिडीओच्या आधारे पीडित प्रवाशांना ब्लॅकमेल करायचा. 

हे ही वाचा: Govt Job: मुंबई हायकोर्टात 2300 हून अधिक पदांसाठी भरती! 10 पास उमेदवारांना सुद्धा संधी...

ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे...

त्यानंतर, आशुतोष संबंधित प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायचा. अशातच, पीडित व्यक्ती घाबरून आरोपीला मागितलेले पैसे द्यायचे. पण, तरीसुद्धा आशुतोषने प्रवाशांचे खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा: मुंबई: दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी, बनावट क्राइम ब्रांच अधिकारी अन्... तब्बल 9.30 लाख रुपये उकळले

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी 

संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी सुद्धा त्यांचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपीने महामार्गाच्या आसपास राहणाऱ्या महिला आणि तरुणींना सुद्धा लक्ष्य केलं. काही गावकऱ्यांनी मिळून 2 डिसेंबर रोजी थेट मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. आता आरोपीवर कठोरातली कठोर करवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

    follow whatsapp