Govt Job: मुंबई हायकोर्टात 2300 हून अधिक पदांसाठी भरती! 10 पास उमेदवारांना सुद्धा संधी...

मुंबई तक

मुंबई हायकोर्टाकडून क्लर्क (लिपिक), शिपाई, स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर (चालक) पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई हायकोर्टात निघाली बंपर भरती!
मुंबई हायकोर्टात निघाली बंपर भरती!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई हायकोर्टात 2300 हून अधिक पदांसाठी भरती!

point

10 पास उमेदवार देखील करू शकतात अर्ज...

Bombay High Court Recruitment: हायकोर्टात नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी बंपर भरतीची बातमी समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाकडून क्लर्क (लिपिक), शिपाई, स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर (चालक) पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवार 15 डिसेंबर 2025 पासून कोर्टाच्या bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार सहभागी होऊ शकतात. या भरतीसाठी 5 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

काय आहे पात्रता? 

मुंबई हायकोर्टाच्या या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. क्लर्क पदासाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असून त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसेच, शिपाई पदासाठी अर्ज करण्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तसेच, चालक म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असण्यासोबत एलएमवी लायसन्स आणि गाडी चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणं अनिवार्य आहे. 

याशिवाय, स्टेनोग्राफर लोअर पदासाठी अर्ज करण्यासाठी पदवी आणि शॉर्टहँड 80wpm सोबत 40wpm टायपिंग स्पीड असणं आवश्यक आहे. तसेच, स्टेनोग्राफर हायर पदासाठी ग्रॅज्युएशन असण्यासोबत  100wpm स्पीडसह शॉर्टहँड आणि 40wpm स्पीडसह टायपिंग गरजेची आहे. पात्रतेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार मुंबई हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

हे वाचलं का?

    follow whatsapp