सौंदर्याची खाण असलेल्या मॉडेलचा घरातच सापडला नग्न अवस्थेत मृतदेह, तिच्यासोबत नेमकं काय घडलं?
पाकिस्तानातील लाहोरमध्ये पोलिस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने घरातच त्याच्या बहिणीचा नग्न अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती दिली. पीडित तरुणी पेशाने मोडेल होती. तिच्यासोबत नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

घरातच नग्न अवस्थेत सापडला मॉडेलचा मृतदेह

नेमकी कशी झाली मॉडेलची हत्या?
Crime News: 11 जुलै 2021 रोजी पाकिस्तानातील लाहोरमध्ये दुपारच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला. फोन करणाऱ्याने त्याचे नाव मोहम्मद नासिर असल्याचं सांगितलं. तो घाबरून म्हणाला, "मी माझी बहीण नायाब नदीम हिच्या घरी तिला भेटायला गेलो होतो. मी दार वाजवले पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मला काहीतरी गडबड असल्याचं वाटलं. मी दुसऱ्या बाजूने घरात प्रवेश केला. त्यावेळी माझ्या बहिणीचा मृतदेह जमिनीवर पडला होता आणि तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता."
पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत ते लाहोरमधील डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी (DHA) च्या फेज-5 मधील नायबच्या घरी पोहोचले. घरातील सामान विखुरलेल्या अवस्थेत होतं आणि नायाबचा मृतदेह नग्न अवस्थेत जमिनीवर पडलेला होता.
कोण होती नायाब नदीम?
नायाब नदीमचा जन्म पाकिस्तानातील लाहोर येथे झाला. त्यानंतर तिचं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगात प्रवेश केला. तिचे कुटुंब रूढीवादी असल्याकारणाने त्यांना मॉडलिंगच्या करिअरसाठी विरोध होता. नायाबच्या वडिलांनी दुसरं लग्न केले होतं आणि त्यातून नायाबला नासिर आणि अहमद असे दोन सावत्र भाऊ होते. नायबने लग्न करून नवऱ्यासोबत आयुष्य घालवावे अशी कुटुंबियांची इच्छा व्हावे अशी इच्छा होती पण नायब स्वतंत्र विचारसरणीची होती. तिला स्वावलंबी व्हायचं होतं.
तिचे बऱ्याचदा तिच्या कुटुंबियांशी वाद व्हायचे. अखेर, नायाबने तिच्या वडिलांचे घर सोडले आणि लाहोरमधील डीएचए फेज-5 मध्ये एक घर विकत घेतलं. तिथे ती एकटीच राहू लागली. कुटुंबियांशी तिचा संपर्क कमी झाला होता. ती फक्त सण किंवा खास प्रसंगी तिच्या कुटुंबियांना भेटायची आणि मदतीच्या वेळीच तिचे सावत्र भाऊ तिला भेटायला यायचे.