Crime News : लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक व्यक्ती विधवा मैत्रिणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. महिलेच्या दोन मुलीही दोघांसोबत राहत होत्या. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला, वाद इतका पेटला की, महिलेनं तिच्या दोन्ही मुलींना पुरुषाचा खून करण्यास सांगितला होता. आईने सांगितल्याप्रमाणे मुलींनी देखील तेच केलं. या प्रकरणातील त्या पुरुषाचं नाव हे सूर्य प्रताप सिंह असे आहे. दोघींनी मिळून सूर्य प्रतापचा चाकूने गळा चिरला आणि अशातच तिचा मृत्यू झाला. या प्रसंगी महिलेनं सूर्याच्या हत्येमागेचं कारण सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जळगावात बेडकामुळे रिक्षा एकमेकांवर आदळून पलटी झाल्या, ड्रायव्हरसह पाच जण गंभीर जखमी
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेच्या मुलीवर वाईट नजर
महिलेनं एक धक्कादायक दावा केला की, पोलीस चौकशीदरम्यान तिने आरोप केला, सूर्य प्रताप सिंगची तिच्या मोठ्या मुलीवर वाईट नजर होती. तो तिला अनेकदा चुकीच्या अर्थाने स्पर्श करत होता. महिलेनं सांगितला की, सूर्याने तिच्या दोन्ही मुलींना घरात कैद करण्यात आले होते. त्याने घरात तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. तसेच मोबाईल फोनद्वारे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. सूर्याने महिलेच्या मोठ्या मुलीला एका खोलीत ओढून कोंडले तेव्हा ती मुलगी ओरडू लागली होती.
ती म्हणाली, 'तिचा ओरडाओरड ऐकून मी आणि माझी धाकटी मुलगी तिथे पोहोचलो. तेव्हा सूर्याने आमच्यावर हल्ला केला होता. माझ्या मुलीला सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. तेव्हा रागाच्याभरात येऊन मुलींनी त्याला पकडले आणि नंतर त्याचा गळा चिरला होता'.
मुलींनीच सूर्य प्रतापवर चाकूने केला हल्ला
महिलेनं हत्येच्याच दिवशी घरी घडलेल्या घटनेचा संपूर्ण प्रकार सांगितला. तिनं सांगितलं की, जेव्हा सूर्याने मोठ्या मुलीला एका खोलीत नेलं आणि कोंडण्यात आलं. तेव्हा तिथे मुलगी आरडाओरड करू लागली होती, त्यानंतर सूर्याने हल्ला केला. माझ्या मुलीला सोडवण्याचा प्रयत्न करताना मी रागाच्या भरात चाकू उचलला आणि आमच्या मुलींनी त्याला पकडले. नंतर मानेवर वार करत हत्या केली.
ही हत्या एक पूर्वनियोजित कट, पोलीस काय म्हणाले?
या प्रकरणात पोलिसांचं म्हणणं आहे की, एका दिवसातील रागाच्या कारणावरून परिणाम वाटत नाही. प्राथमिक तपासातून दिसून आले की, सूर्याची हत्या ही एक पूर्वनियोजित कटच होता. म्हणूनच महिलेने घराची मालकी हल्ला सांगितला. आरोपीचे असे म्हणणं आहे की, तिने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या पेन्शनच्या पैशातून एक कार देखील खरेदी करण्यात आली होती. या कारवरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असे.
हे ही वाचा : या' राशीतील लोकांच्या प्रेमसंबंधात रोमान्स वाढेल, काही राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस
मृताचे वडील नरेंद्र सिंग यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचा मुलगा चांगले पैसे कमावणारा आहे. माझ्या मुलाच्या पैशातून ती महिला आणि तिच्या मुली ऐश आरामाचं जीवन जगत होत्या. तेव्हा नरेंद्र सिंग म्हणाले की, ते त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी जोडीदार शोधत होते आणि ज्या दिवशी खून झाला तेव्हा सूर्याने त्यांच्याशी फोनद्वारे बोलून पैसे पाठवले. अशातच आता पोलिसांनी मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी आणि तिच्या मुलींना तुरुंगात टाकण्यात आले आणि या प्रकरणाचा सर्वच बाजूंनी तपास सुरु करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











