crime news : केवळ राज्यातच नाही, तर देशभरात अनैतिक संबंधांच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यामुळेच काहींना नात्यांची कदर राहिलेली नाही. बिहारमधील मुजफ्फरनगरमध्ये काकूचे पुतण्यासोबत सूत जुळल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काकूला आपला पती आवडत नसल्याने, काकीचीच आपल्या पुतण्यावर नजर पडली आणि दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले. काकूच्या या अशा कृत्याने ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पतीने काकूविरोधात म्हणजे त्याच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रक्षाबंधन 2025 : शनि आणि मंगळाचा समसप्तक योग, कसं असेल बहीण भावाचं नातं?
नेमकं काय घडलं?
ही घटना बोचाहान पोलीस ठाणे परिसरातील एका गावात घडली. पीडित पतीचे नाव नवल किशोर असे आहे. तर पत्नीचे नाव हे खुशबू देवी असे आहे. दोघांचा सुखाने संसार सुरु होता. मात्र, काकीचीच आपल्या पुतण्यावर नजर पडली आणि संसार उद्ध्वस्त झाला. पती बाहेर असताना खुशबू देवी आपल्या पुतण्याला घरी बोलवायची. नंतर काकूने पुतण्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. अंतिम क्षणी तिने पुतण्यासोबत पळून जाण्यापूर्वी तिने पतीवर हात उचलला.
पत्नीने दिली धमकी म्हणाली...
या प्रकरणातीत पुतण्या हा आपल्या काकीपेक्षा 10 वर्षांहून लहान असल्याची माहिती समोर आली. अशातच खुशबू देवीला तिच्या प्रियकरासोबत 50 हजार रुपये रोख रक्कम आणि लाखो रुपयांचे दागिने आणि जमिनीची कागदपत्रे घेऊन घरातून पळून जाण्याचा विचार करत होती. त्यानंतर याबाबतची माहिती मिळताच पीडित पतीने तिला अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबली नाही. त्यानंतर तिने पतीला मारहाणही केली आणि दोघेही पळून गेले. जाताना खुशबूने धमकी दिली की, जर हे कोणाला सांगितल्यास आत्महत्या करेल.
हे ही वाचा : Mumbai Weather: रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईत कसं असेल हवामान, मुसळधार पाऊस कोसळणार?
पोलिसांनी पीडितेला तपास आणि कारवाईचे आश्वासन देण्यात आले. संबंधित प्रकरणात पोलिसांनी एफआरआय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आणि कारवाई सुरु आहे, अशी माहिती सांगितली.
ADVERTISEMENT
