पती गेला अंघोळीला, पत्नीने बॉयफ्रेंडला बोलावलं आणि सगळ्यांनाच दिला मोठा 'शॉक'

extra marital affairs : महिलेचा पती अंघोळीसाठी नदीवर गेला असताना पत्नी आपल्या बाळाला घेऊन आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. त्यानंतर नेमकं काय घडलं ते सविस्तरपणे वाचा.

extra marital affairs wife ran away with her boyfriend what exactly happened

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

09 Aug 2025 (अपडेटेड: 13 Aug 2025, 06:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेचा पती अंघोळीसाठी नदीवर गेला

point

पत्नीनं काढला बॉयफ्रेंडसोबत काढला पळ

Extra Marital Affairs: अनैतिक संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. केवळ राज्यच नाही,तर देशभरात अशी परिस्थिती दिसून येत आहे. अशीच एक घटना कानपूर येथे उघडकीस आली आहे. महिलेचा पती अंघोळीसाठी नदीवर गेला असताना पत्नी आपल्या बाळाला घेऊन आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. तिने आपल्यासोबत तब्बल 15 लाखांचे दागिने घेतले आणि पळ काढला. ही घटना कानपूरजवळील शिवराजपूर गावात घडली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : काकीचा जडला पुतण्यावर जीव, नवरा बाहेर गेल्यानंतर बोलवायची घरात अन् दोघेही...नंतर नवऱ्याला दिली धमकी

पीडित पतीचे नाव अजय सिंग असे आहे, तर तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. अजय हा श्रावण महिन्यात गंगेत स्नान करण्यासाठी गेला होता. यावेळी घरी फक्त त्याची पत्नी आणि एकुलता एक मुलगा तिथं होता. जेव्हा अजय घरी परतला तेव्हा घराची परिस्थिती पाहून तो थक्क झाला.

नेमकं काय घडलं?

जेव्हा अजय घराबाहेर पोहोचला तेव्हा त्याला घराचा दरवाजा बंद दिसला. अजयने आजूबाजूच्या लोकांकडून याबद्दल विचारपूस केली. शेजाऱ्यांनी सांगितले की, एक तरुण आला आणि महिलेला गाडीत बसवले आणि तिला घेऊन गेला. अजयने शेजाऱ्यांना याबाबत विचारले असता, शेजाऱ्यांनी पत्नी एका तरुणाच्या गाडीत बसून गेल्याचं सांगितलं. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून अजयच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर सर्व काही अस्ताव्यस्त कपाट होते. तिथे ठेवण्यात आलेले दागिने गायब झाले होते.

पीडित पतीने सांगितलं सर्वच

दरम्यान, अजयने आपल्या पत्नीबाबत मोठा खुलासा केला. पत्नीचे दीपक कटियार नावाच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कामावर गेला तेव्हा त्याच्या घरी तो यायचा आणि पत्नीसोबत वेळ घालवायचा. दोघांनाही अनेकदा बाजारात रंगेहाथ पकडलं होते. त्यानंतर आता अजयच्या लक्षात आले की, घरी नसल्याचा फायदा घेत पत्नीने गैरफायदा घेत परपुरूषासोबत पळ काढला.

हे ही वाचा : घरातच नग्न अवस्थेत सापडला मॉडेलचा मृतदेह... शरीरावरचे 'ते' निशाण अन् सर्वच...

अजयने पोलीस ठाणे गाठलं आणि घटनेची तक्रार दाखल केली. याच आधारावर पोलीस पुढील कारवाई करत आहेत. प्राथमिक तपासातून संगीता आणि दीपक यांचे काही वर्षांपासूनच प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. संबंधित प्रकरणात पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.

    follow whatsapp