Uddhav Thackeray यांना निकालाची कुणकुण लागली? जनतेशी संवाद साधत म्हणाले…

मुंबई तक

08 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:05 AM)

Uddhav Thackeray | Election Commission : मुंबई : कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. पक्ष फक्त निवडून आलेल्या व्यक्तींवर अवलंबून नसतो. निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांवर पक्ष म्हणून मान्यता मागितली तर उद्या कोणीही उद्योगपती पक्ष आणि आमदार विकत घेतील आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान होतील, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री […]

Mumbaitak
follow google news

Uddhav Thackeray | Election Commission :

हे वाचलं का?

मुंबई : कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. पक्ष फक्त निवडून आलेल्या व्यक्तींवर अवलंबून नसतो. निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांवर पक्ष म्हणून मान्यता मागितली तर उद्या कोणीही उद्योगपती पक्ष आणि आमदार विकत घेतील आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान होतील, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. (Maharashtra shiv sena Uddhav Thackeray press conference on election commission-result-in-Mumbai)

शिवसेनेचं काय होणार? नाव, चिन्ह नेमकं कोणाला मिळणार? याबद्दलचा खटला निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून निवडणूक आयोग कधीही निकाल देऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (८ फेब्रुवारी) उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगातील आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत माहिती दिली.

Mumbai Airport : राहुल गांधींच्या आरोपांनंतर GVK च्या उपाध्यक्षांचा मोठा दावा

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :

  • दिल्लीमध्ये अनेक दरबार, पण आपल्यासाठी सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग हे दोन महत्त्वाचे.

  • मी दुसरी शिवसेना मानत नाही.

  • शिवसेनेच्या घटनेत शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनापक्षप्रमुख हीच दोन पद. मुख्य नेता हे पद घटनाबाह्य.

  • निवडून आलेले लोकच म्हणजेच पक्ष हा शिंदे गटाचा दाव हास्यास्पद.

  • गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणं हा नीचपणा आहे.

  • सु्प्रीम कोर्टाच्या निकालाआधी आयोगाचा निर्णय नको. सुप्रीम कोर्टानं लवकर निर्णय घ्यावा.

  • आमदार अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा. तो खटला आधी सुरु झाला.

  • आमदार अपात्र होणार असतील, तर त्यांचा दावा ग्राह्य कसा?

  • पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नाही.

  • पैशाच्या बळावर उद्या उद्योगपतीही पंतप्रधान होईल.

  • अंधेरीची निवडणूक लढवणार नव्हते, मग चिन्ह का गोठवलं?

  • १४ जानेवारीपासून घटनापीठापुढे मॅरेथॉन सुनावणी अपेक्षित

  • जनतेच्या मनात संभ्रम नको म्हणून पत्रकार परिषद

  • निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल कोणतीही भीती नाही

  • निकाल आमच्याच बाजूने लागणार

  • संविधानाने शिवसेनेला कोणताही धोका नाही.

  • गेल्यावेळी त्यांनी (शिंदे) मला पक्षप्रमुख मानलं आहेच ना?

  • अनिल देसाई हे आमचे निवडणूक आयुक्त आहेत.

Aditya Thackeray यांच्या सभेत जोरदार राडा; नेमकं काय घडलं?

ठाकरेंना निकालाची कुणकुण लागली?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच पत्रकार परिषद घेतल्याने त्यांना आयोगात काय निकाल लागणार याची कुणकुण लागली आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. निवडणूक आयोगात या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून निवडणूक आयोग कधीही निकाल देऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.

    follow whatsapp