मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यासाठी आंदोलनही सुरू केलं होतं. आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे संसदेत हा प्रश्न मांडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती प्रय़त्नशील आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. यामागचं कारण काय आहे ते त्यांनी स्वतःच सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे संभाजीराजे यांचं म्हणणं?
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सभापतींनी तीन वेळा प्रश्न मांडण्यासाठी वेळ देखील दिला. मात्र सत्ताधारी व विरोधी पक्षात काही विषयांवर असमन्वय असल्याने त्याचे पडसाद सभागृहात उमटून वारंवार कामकाज स्थगित होत आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा प्रस्न अद्यापही संसदेत मांडता आलेला नाही. इतरही अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. विरोधकांचा ज्यावर आक्षेप आहे, त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सामंज्यसाने एकत्र बसून विषय सोडवावेत त्यासाठी संसदेच्या कामकाजात बाधा आणू नये.
ADVERTISEMENT
