आमदार देवेंद्र भुयार यांना तुरूंगवासाची शिक्षा; तहसीलदारांसोबतचा ‘तो’ वाद भोवला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने भुयार यांना तीन महिने कारावास आणि पंधरा हजार दंडाची शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने निकाल दिला. २७ फेब्रुवारी २०१३ रोजी काय घडलं? भुयारांचा नेमका गुन्हा काय? साल होतं २०१३! तारीख होती फेब्रवारी महिन्यातील २७… त्यावेळी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:26 AM • 17 Aug 2021

follow google news

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने भुयार यांना तीन महिने कारावास आणि पंधरा हजार दंडाची शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने निकाल दिला.

हे वाचलं का?

२७ फेब्रुवारी २०१३ रोजी काय घडलं? भुयारांचा नेमका गुन्हा काय?

साल होतं २०१३! तारीख होती फेब्रवारी महिन्यातील २७… त्यावेळी देवेंद्र भुयार हे आमदार नव्हते. ज्वारी खरेदी केंद्र बंद केल्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. २७ फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन तहसीलदार राम लंके हे कार्यालयात कामकाज करीत असताना देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन त्यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी तहसिलदारांना धारेवर धरलं.

‘बाजार समितीमधील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद का आहे? माझा फोन का उचलत नाही? फोन कट का केला?,’ अशी विचारणा भुयार यांनी तहसीलदारांना केली. भुयार यांनी यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आणि माईक फेकून मारल्याचा आरोप तत्कालिन तहसीलदार राम लंके यांनी पोलीस स्टेशनला दाखल केली होती.

लंके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यावेळी पंचायत समिती सदस्य असलेल्या देवेंद्र भुयार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. वरुड तहसील कार्यालयात हा प्रकार घडला होता. शिवीगाळ व मारण्याची धमकी देत माईक फेकून मारणे आणि शासकीय कामात त्यांनी अडथळा निर्माण केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दंड न भरल्यास तुरुंगवास

स्थानिक न्यायालयाने आमदार भुयार यांना तीन महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एस. आडकर यांनी सोमवारी (१६ ऑगस्ट) हा निकाल दिला. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानं न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना दोषी ठरवलं. त्यांना तीन महिने सक्तमजुरी व पंधरा हजार रुपये दंड; दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

    follow whatsapp