‘गुहागरचं माकड’; योगेश कदमांचं भास्कर जाधवांना प्रत्युत्तर, शिव संवाद यात्रेची उडवली खिल्ली

मुंबई तक

18 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:46 AM)

आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रेची दापोलीची आमदार योगेश कदम यांनी खिल्ली उडवली. त्याचबरोबर रामदास कदम यांच्यावर टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांना थेट गुहागरचं माकडं म्हणत योगेश कदमांनी प्रत्युत्तर दिलं. दापोलीत आज शिंदे गटाचा मेळावा झाला. या कार्यक्रमात बोलताना योगेश कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यासह आदित्य ठाकरेंवरही निशाणा […]

Mumbaitak
follow google news

आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रेची दापोलीची आमदार योगेश कदम यांनी खिल्ली उडवली. त्याचबरोबर रामदास कदम यांच्यावर टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांना थेट गुहागरचं माकडं म्हणत योगेश कदमांनी प्रत्युत्तर दिलं.

हे वाचलं का?

दापोलीत आज शिंदे गटाचा मेळावा झाला. या कार्यक्रमात बोलताना योगेश कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यासह आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. शिव संवाद यात्रेची खिल्ली उठवली.

योगेश कदम म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी चौकात काही कार्यकर्ते जमले होते. मी कधीही पातळी सोडून बोललो नाही. परवाच्या दिवशी राजकीय व्यक्ती किती खालची पातळी गाठू शकते हे गुहागरच्या एका माकडाने दाखवून दिलं’, असं म्हणत भास्कर जाधवांना उत्तर दिलं.

‘दापोली मतदारसंघात चार भारतरत्न आहे. दापोलीला वेगळी संस्कृती आहे. दापोली तालुक्याला बदनाम करण्याचं काम केलं गेलं. आई आणि बहिणीवरून भाषा. दापोलीतून शिवसेनेचा भगवा उतरला होता. त्यानंतर आपण हा भगवा पुन्हा वर चढवला. दापोलीत विकास कामं केली तेव्हा शिवसेना जिवंत झाली’, असं योगेश कदम म्हणाले.

‘२०१६ सालापासून मी इथे काम करायला सुरूवात केली. लहानपणापासून आम्ही एकच विचार बघितलाय, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार. योगेश कदमपासून ताकद तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीची डाळ शिजवण्याचं काम सुरुये’, असं म्हणत योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

शरद पवार शिवसेना वाढवताहेत ऐकलंत का?; राष्ट्रवादी योगेश कदमांची टीका

‘राष्ट्रवादी शिवसेना वाढवायला बसलीये का? शरद पवार कोकणात शिवसेना वाढवताहेत हे कधी ऐकलंत का? उलट महाविकास आघाडी होताना मी एकट्याने विरोध केला. जिल्हास्तराव महाविकास आघाडी होण्यास विरोध केला. शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न होता’, असा आरोप राष्ट्रवादीवर योगेश कदम यांनी केला.

मुख्यमंत्री आपला आणि निधी वाटप राष्ट्रवादी करत होती -योगेश कदम

‘महाविकास आघाडी झाली, मुख्यमंत्री आपले आणि निधी वाटप कोण करतंय, तर राष्ट्रवादी. मतदारसंघातील कुणबी सरकार फोडण्याचा प्रयत्न केला. शिवसेना फोडून राष्ट्रवादी वाढवण्याचा डाव होता. आम्ही आमदारांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. कोणतीच पावलं उचलली नाही’, असंही योगेश कदम म्हणाले.

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंवर योगेश कदमांची टीका

‘निसर्ग चक्रीवादळ कोकणात आलं. त्यावेळी मी आदित्य ठाकरेंना फोन केला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केला होता. साहेब, प्रचंड नुकसान झालंय. तुम्ही इथे या. ते आले नाहीत. आलं कोण तर एकनाथ शिंदे आले आणि मदत घेऊन आले’, असं म्हणत योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘राष्ट्रवादीचे नेते आले पण आपले नेते आले नाही. मी काहीच बोललो नाही. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते त्यावेळी आले आणि आपले नेते आले नाहीत. शिवसेनेकडून जास्त अपेक्षा होती’, अशी टीका योगेश कदमांनी केली.

    follow whatsapp