MNS: …म्हणून अमित ठाकरे स्टेजच्या कोपऱ्यातील खुर्चीवर जाऊन बसले!

मुंबई तक

• 11:35 AM • 01 Oct 2021

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली मनसे नेते अमित राज ठाकरे आज आणि उद्या कल्याण-डोंबिवलीमधील कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या चार विधानसभा क्षेत्रामधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. या दौऱ्यासाठी अमित ठाकरे मुंबईवरून लोकल मधून प्रवास करून डोंबिवली आले. दरम्यान, डोंबिवली पूर्वेतील शिळरोड लगत कुशाळा हॉटेलमध्ये शाखा अध्यक्षाची बैठक बोलविण्यात आली होती. याच बैठकीला अमित […]

Mumbaitak
follow google news

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली

हे वाचलं का?

मनसे नेते अमित राज ठाकरे आज आणि उद्या कल्याण-डोंबिवलीमधील कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या चार विधानसभा क्षेत्रामधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. या दौऱ्यासाठी अमित ठाकरे मुंबईवरून लोकल मधून प्रवास करून डोंबिवली आले.

दरम्यान, डोंबिवली पूर्वेतील शिळरोड लगत कुशाळा हॉटेलमध्ये शाखा अध्यक्षाची बैठक बोलविण्यात आली होती. याच बैठकीला अमित ठाकरे यांनी एक अशी गोष्ट केली की, ज्यामुळे त्यांनी तेथील सर्वांचंच मन जिंकलं. बैठकीसाठी व्यासपीठावर जी आसन व्यवस्था करण्यात आली होती. तिथे आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मान देत अमित ठाकरे यांनी स्वतः मात्र कोपऱ्यातील खुर्चीत बसणं पसंत केलं.

यावेळी व्यासपीठावर मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह आमदार राजू पाटील, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर आणि शिरीष सावंत हे सर्व नेते उपस्थित होते.

अमित ठाकरे रस्त्यांवरील खड्डे, ट्रॅफिक यामुळे लोकलने प्रवास करणं पसंत केलं. स्वत: अमित ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आल्याने मनसे आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

कल्याण-डोंबिवलीत विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा बैठका घेतल्या जात आहे. याबाबत मनसे नेते शिरीष सावंत यांनी सांगितले की, ‘शाखा अध्यक्षांची आत्तापर्यंतची वाटचाल, काही त्रुटी आहेत का आणि त्याला पुढे कसे जाता येईल. शेवटच्या मतदारपर्यंत त्याला कसे पोहोचता येईल त्यादृष्टीने बांधणी करत आहोत.’

मराठीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला बाळा नांदगावकर यांचं नाव न घेता टोला

डोंबिवलीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा पुन्हा एकदा मराठीच्या विषयाला हात घालत सत्ताधारी शिवसेनेला नाव न घेता टोला हाणला आहे. नांदगावकर यांनी सांगितले की, इतके वर्षे मराठी-मराठी करून मतं घेतली, सत्ता आपल्या हातात आहे, राज्य आपल्या हातात. एवढे सगळे ताब्यात असताना मराठीची गळचेपी का झाली? का मराठी भाषेला सन्मान मिळत नाही. का अभिजात भाषेचा सन्मान मिळत नाही? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी यावेळी केला आहे.

मनसे नेते अमित राज ठाकरे लोकलने जाणार डोंबिवलीत; दोन दिवस कल्याण-डोंबिवलीत

दरम्यान, येत्या काही महिन्यात कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते हे या भागात दौरे करत आहेत.

    follow whatsapp